पुरस्कार प्रक्रिया पारदर्शी : सोनोवाल

By Admin | Updated: August 30, 2015 22:38 IST2015-08-30T22:38:54+5:302015-08-30T22:38:54+5:30

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवडीच्या प्रक्रियेची समीक्षा करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट मत क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.

Award process transparent: Sonowal | पुरस्कार प्रक्रिया पारदर्शी : सोनोवाल

पुरस्कार प्रक्रिया पारदर्शी : सोनोवाल

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निवडीच्या प्रक्रियेची समीक्षा करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट मत क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांप्रमाणेच या वर्षीदेखील पुरस्कार चुकीच्या कारणांमुळे प्रकाशझोतात राहिले. सानिया मिर्झा हिला राजीव खेलरत्न पुरस्कार देण्याविरुद्ध बंगळुरू येथील न्यायालयात पॅरालिम्पियन एचएन गिरीशा हिने याचिका दाखल केली. तसेच कुस्तीचे माजी प्रशिक्षिक विनोद कुमार यांनीही द्रोणाचार्य पुरस्कार दिला नसल्यामुळे त्यांनीसुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
(वृत्तसंस्था)

Web Title: Award process transparent: Sonowal