अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:20 AM2023-07-17T11:20:02+5:302023-07-17T11:20:58+5:30

AVINASH SABLE QUALIFIED FOT THE PARIS OLYMPIC - भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला

Avinash qualified for the Olympics after finishing with a season Best timing of 8:11:63 and just short of a NR in 3000 M Steeplechase  | अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

googlenewsNext

AVINASH SABLE QUALIFIED FOT THE PARIS OLYMPIC - भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला.  पोलंडच्या चोरझो येथे झालेल्या सिलेसिया डायमंड लीग २०२३ ॲथलेटिक्स मीटमध्ये अविनाशने ८:११.६३ सेकंदाची वेळ नोंदवली आणि या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिक पात्रतेच्या ८:१५.००सेकंदाच्या आतील वेळ नोंदवली. त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.  


केनियाचा अब्राहम किबिवोट ज्याने गतवर्षी राष्ट्रकुल २०२२ चे सुवर्ण जिंकले त्याने ८:०८.०३ सह दुसरे स्थान पटकावले तर विद्यमान ऑलिम्पिक, जागतिक आणि डायमंड लीग चॅम्पियन, मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने ८:०३.१६ च्या विक्रमी वेळेसह शर्यत जिंकली. ऑलिम्पिक पात्रता कालावधी १ जुलै २०२३ रोजी सुरू झाला आणि ३०जून २०२४ पर्यंत सुरू राहील. 


डायमंड लीग फायनल २०२३ च्या रनअपमध्ये साबळेने सिलेसिया येथे तीन पात्रता रँकिंग गुण मिळवले आणि आता सात गुणांसह ते नवव्या स्थानावर आहे. डायमंड लीग २०२३ मधील साबळेचा हा तिसरा सामना होता आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तो राबात लेग क्लॉकमध्ये ८:१७.१८ सह १०व्या आणि स्टॉकहोम लेगमध्ये ८:२१.८८ वेळेसह पूर्ण करत पाचव्या स्थानावर राहिला.
  

Web Title: Avinash qualified for the Olympics after finishing with a season Best timing of 8:11:63 and just short of a NR in 3000 M Steeplechase 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.