आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

By Admin | Updated: July 19, 2015 22:14 IST2015-07-19T22:14:53+5:302015-07-19T22:14:53+5:30

मिशेल जॉन्सन ३/२७, जोस हेजलवूड २/२० आणि नाथन लियोन २/२७ यांच्या भेदक गोलंदाजीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने अ‍ॅशेज मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ४०५

Australia's winning sound | आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

आॅस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

लंडन : मिशेल जॉन्सन ३/२७, जोस हेजलवूड २/२० आणि नाथन लियोन २/२७ यांच्या भेदक गोलंदाजीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने अ‍ॅशेज मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ४०५ धावांनी दणदणीत पराभव केला. चौथ्या दिवशी संपलेल्या या लढतीमुळे आॅस्ट्रेलियाने मालिकेत १-१ बरोबरी साधली.
आॅस्ट्रेलिया संघाने उपाहाराआधी आपला दुसरा डाव २ बाद २५४ या धावांवर घोषित करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ५0९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने अ‍ॅलेस्टर कुक (११), अ‍ॅडम लिथ (७), गॅरी बॅलेन्स (१४), इयान बेल (११), बेन स्टोक्स (0), बटलर (११), मोईन अली (0) हे सात बिनीचे खेळाडू गमावले आहेत.
तत्पूर्वी इंग्लंडने आज सकाळी बिनबाद १0८ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. सलामीवीर फलंदाज ख्रिस रॉजर्स २ षटकानंतर चक्कर आल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला. त्या वेळेस तो ४९ धावांवर खेळत होता. डेव्हिड वॉर्नरने ८३ आणि स्टीव्हन स्मिथने ५८ धावांची आक्रमक खेळी केली.क्लार्कने दुसरा डाव घोषित केला तेव्हा तो स्वत: ३२ आणि मिशेल मार्श २७ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून फक्त आॅफस्पिनर मोईन अलीने ७८ धावांत २ गडी बाद केले. अलीने वॉर्नरला कुककरवी झेलबाद केल्यानंतर स्मिथलाही तंबूत धाडले.
इंग्लंडला हा सामना जिंकायचा असल्यास त्यांना मोठी कामगिरी करावी लागणार आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वांत मोठे लक्ष्य यशस्वी पेलण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. त्यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध २00३ मध्ये सेंट जोन्स येथे ७ बाद ४१८ धावा
करीत विजय मिळवला
होता. इंग्लंडचा विक्रम ३३२ धावा आहे. तो त्यांनी १९२८-२९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्न येथे केला होता. आॅस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

कुकच्या नावावर इंग्लंडसाठी ‘नर्व्हस नाइन्टीज’चा विक्रम
लंडन : इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याच्या नावावर लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यादरम्यान नकोसा वाटणारा विक्रम जोडला गेला आहे. कुक हा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शतकापासून वंचित राहिला. त्यामुळे सात वेळा शतकापासून वंचित राहण्याचा इंग्लंडकडून त्याच्या नावावर हा विक्रम लागला. कुकने अ‍ॅशसच्या गेल्या २३ डावांत एकही शतक केले नाही आणि लॉर्ड्स कसोटीत तो तिसऱ्या दिवशी शनिवारी ९६ धावांवर बाद झाला.

संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ८ बाद ५६६ (घोषित). दुसरा डाव २ बाद २५४ (घोषित). (डेव्हिड वॉर्नर ८३, स्टीव्हन स्मिथ ५८, क्लार्क नाबाद ३२, मार्श नाबाद २७, रॉजर्स ४९. मोईन अली २/७८)
इंग्लंड : पहिला डाव ३१२. दुसरा डाव ३७ षटकात सर्वबाद १०३. (जोरुट १७, स्टुअर्ट ब्रॉड २५, जॉन्सन ३/२७, हेजलवूड २/२०, नाथन लियोन २/२७, मिशेल मार्श १/८, स्टार्क १/१६, ).

(वृत्तसंस्था)

Web Title: Australia's winning sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.