आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

By Admin | Updated: July 19, 2015 00:41 IST2015-07-19T00:41:01+5:302015-07-19T00:41:01+5:30

ख्रिस रॉजर्स ( खेळत आहे ४४) आणि डेव्हिड वॉर्नर (खेळत ६०) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या अ‍ॅशेज क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी

Australia's strong position | आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

लंडन : ख्रिस रॉजर्स ( खेळत आहे ४४) आणि डेव्हिड वॉर्नर (खेळत ६०) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागिदारीमुळे आॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या अ‍ॅशेज क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात बिनबाद १०८ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड संघाचा पहिला डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला होता. आॅस्ट्रेलियाकडे ३६२ धावांची आघाडी असून त्यांचा एकही फलंदाज बाद झालेला नाही.
तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार अलेस्टर कुक व बेन स्टोक्स यांनी ४ बाद ८५ धावांवरून आपल्या डावाचा खेळ सुरू केल्यानंतर कुक आणि स्टोक्सने दमदार फलंदाजी
केली. अ‍ॅलेस्टर कुकने १३ चौकारांसह ९६ धावांची झुंजार खेळी हे
वैशिष्ट्य ठरले. त्याला स्टोक्सने
१३ चौकार व १ षटकारासह
८७ धावांची खेळी करून चांगली
साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीमुळे इंग्लंड संघ आपल्या पहिल्या डावात ३०० धावांचा पल्ला गाठू शकला.
अ‍ॅलेस्टर कुक व स्टोक्स बाद झाल्यानंतर बटलरला १३ धावांवर लियोनने बाद केले. त्यानंतर मोईन अलीने ५ चौकार व एक षटकाराच्या साहाय्याने ५७ चेंडूंत ३९ धावांची खेळी केली. स्टुअर्ट ब्रॉडने २१ धावा
इंग्लंडचा पहिला डाव ३१२
धावांत संपुष्टात आला. इंग्लंड संघाचे ५ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. आॅस्ट्रेलियाकडून हेजल वूडने ६८ धावांत ३ जॉन्सने ५३ धावांत ३, तर मार्शने २३ धावांत २ गडी बाद केले.
आॅस्ट्रेलियाच्या रॉजर्स आणि वॉर्नरने दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात केली. रॉजरने ७२ चेंडूंत ५ चौकारांच्या साहाय्याने ४४, तर वॉर्नरने १० चौकारांच्या साहाय्याने ६० धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ८ बाद ५६६ (घोषित). इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद ३१२. (अ‍ॅलेस्टर कुक ९६, जी. बॅलन्स २३, बेन स्टोक्स ८७, मोईन अली ३९, स्टुअर्ट ब्रॉड २१, हेजलवूड ३/६८, मिशेल जॉन्सन ३/५३, मिशेल मार्श २/२३, स्टार्क १/८६, लियोन १/५३). आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : बिनबाद १०८ (ख्रिस रॉजर्स खेळत आहे ४४, डेव्हिड वॉर्नर खेळत ६०

Web Title: Australia's strong position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.