आॅस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

By Admin | Updated: March 4, 2015 23:57 IST2015-03-04T23:57:57+5:302015-03-04T23:57:57+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या (१७८) शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने विश्वकप स्पर्धेत ‘अ’ गटात बुधवारी खेळल्या गेलेल्या लढतीत अफगाणिस्तानवर विक्रमी २७५ धावांनी विजय मिळविला.

Australia's record victory | आॅस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

आॅस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

वॉर्नरची शतकी खेळी : अफगाणिस्तानवर २७५ धावांनी मात
पर्थ : डेव्हिड वॉर्नरच्या (१७८) शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने विश्वकप स्पर्धेत ‘अ’ गटात बुधवारी खेळल्या गेलेल्या लढतीत अफगाणिस्तानवर विक्रमी २७५ धावांनी विजय मिळविला. विश्वकप स्पर्धेत हा सर्वांत मोठ्या फरकाने मिळविलेला विजय ठरला.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आॅस्ट्रेलियाने ६ बाद ४१७ धावांची दमदार मजल मारली. वॉर्नरने १३३ चेंडूंना सामोरे जाताना १७८ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त स्टीव्हन स्मिथने ९८ चेंडूंमध्ये ९५ धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरात खेळताना प्रथमच विश्वकप स्पर्धेत खेळणारा अफगाण संघाचा डाव ३७.३ षटकांत १४२ धावांत संपुष्टात आला. अफगाणिस्तानतर्फे सर्वांत अनुभवी खेळाडू नवरोज मंगलने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. गेल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने विश्वकप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा व सर्वांत मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचा भारताचा विक्रम मोडला. भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध विश्वकप स्पर्धेतील लढतीत ५ बाद ४१३ धावांची मजल मारली होती आणि २५७ धावांनी विजय मिळविला होता.
वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वांत मोठा विजय ठरला. यापेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजय मिळविण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने २००८ मध्ये एबरडीनमध्ये आयर्लंडविरुद्ध २९० धावांच्या फरकाने विजय मिळविला होता.

च्विश्वकप स्पर्धेत
गेल्या सहा दिवसांत तिसऱ्यांदा ४०० पेक्षा अधिक धावसंख्येची नोंद झाली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ५ बाद ४०८ आणि आयर्लंडविरुद्ध ४ बाद ४११ धावा फटकाविल्या
होत्या.

४१७ विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक एकूण धावा. यापूर्वी भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा केल्या होत्या.

२६० वॉर्नर व स्मिथ यांच्यातील भागीदारी. आॅस्ट्रेलियातर्फे ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वाेच्च भागीदारी. २००९ मध्ये रिकी पॉँटिंग व शेन वॉर्न यांनी २५२ धावांची भागिदारी केली होती.

३ वॉर्नर आणि स्मिथ यांच्यातील २५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी होण्याची वेळ. ही एकूण विश्वचषक स्पर्धेतील पाचवी, तर सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतील तिसरी भागीदारी.

च्यापूर्वी रिकी पॉन्टिंग व शेन वॉटसन यांनी २००९ मध्ये सेंच्युरियनमध्ये इंग्लंडविरुद्ध २५२ धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरने कारकिर्दीतील चौथी वन-डे शतकी खेळी १९ चौकार व ५ षटकारांनी सजवली. स्मिथने अर्धशतकी खेळीत ८ चौकार १ षटकार ठोकला. वॉर्नर विश्वकप स्पर्धेत आॅस्ट्रेलियातर्फे सर्वोच्च
खेळी करणारा फलंदाज ठरला.
त्याने मॅथ्यू हेडनचा (१५८) विक्रम मोडला. हेडनने २००७मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अ‍ॅन्टिग्वामध्ये हा विक्रम नोंदविला होता.

च्वॉर्नर व स्टीव्हन स्मिथच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने ही किमया साधली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी २६० धावांची भागीदारी केली. वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी आॅस्ट्रेलियातर्फे हा भागीदारीचा विक्रम आहे.

६७.५७
एकदिवसीय सामन्यातील स्मिथची तिसऱ्या क्रमांकावरील धावांची सरासरी.

ग्लेन मॅक्सवेलने केवळ ३९ चेंडूंमध्ये ८८ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ६ चौकार व ७ षटकार ठोकले. मॅक्सवेलने केवळ २१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण
केले.

आॅस्ट्रेलिया :- डेव्हिड वॉर्नर झे. नबी गो. जदरान १७८, अ‍ॅरोन फिंच झे. मंगल गो. दौलत जदरान ४, स्टिव्हन स्मिथ झे. मंगल गो. शापूर जदरान ९५, ग्लेन मॅक्सवेल झे. नबी गो. दौलत जदरान ८८, जेपी फॉकनर त्रि. गो. हामिद ७, मिशेल मार्श झे. एन. जदरान गो. मंगल ८, ब्रॅड हॅडिन नाबाद २०. अवांतर (१७). एकूण ५० षटकांत ६ बाद ४१७. बाद क्रम : १-१४, २-२७४, ३-३३९, ४-३८२, ५-३९०, ६-४१७. गोलंदाजी : दौलत जदरान १०-१-१०१-२, शापूर जदरान १०-०-८९-२, हामिद हसन १०-०-७०-१, नबी १०-०-८४-०, शेनवारी ५-०-३४-०, अहमदी ४-०-१८-०, मंगल १-०-१४-१.

अफगाणिस्तान : जावेद अहमदी झे. क्लार्क गो. हेजलवुड १३, उस्मान घनी झे. फॉकनर गो. जॉन्सन १२, नवरोझ मंगल झे. फिंच गो. जॉन्सन ३३, असगर स्टॅनिकझाई झे. स्मिथ गो. जॉन्सन ४, मोहम्मद नबी झे. क्लार्क गो. मॅक्सवेल २, नजिबुल्ला जदरान त्रि. गो. स्टार्क २४, अफसर झझाई झे. हॅडिन गो. हेजलवुड १०, दौलत जदरान त्रि. गो. स्टार्क ००, हमिद हसन झे. वॉर्नर गो. जॉन्सन ७, शापूर जदरान नाबाद ००. अवांतर (२०). एकूण ३७.३ षटकांत सर्व बाद १४२. बाद क्रम : १-३०, २-३२, ३-४६, ४-९४, ५-९४, ६-१०६, ७-१३१, ८-१३१, ९-१४०, १०-१४२. गोलंदाजी : स्टार्क ६-०-१८-२, हेजलवुड ८-१-२५-२, जॉन्सन ७.३-०-२२-४, क्लार्क ५-०-१४-१, मार्श ३-०-२५-०, फॉकनर ४-०-८-०, मॅक्सवेल ४-१-२१-१.

Web Title: Australia's record victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.