ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट, भारताची कसोटीवर पकड

By Admin | Updated: March 20, 2017 12:03 IST2017-03-20T10:32:58+5:302017-03-20T12:03:59+5:30

तिस-या कसोटीवर पकड मिळवणा-या भारताने आणखी दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आणला आहे.

Australia's 4 wickets, grip on India's Test | ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट, भारताची कसोटीवर पकड

ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट, भारताची कसोटीवर पकड

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 20 - तिस-या कसोटीवर पकड मिळवणा-या भारताने आणखी दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आणला आहे. सकाळच्या सत्रात सावध सुरुवात करणा-या ऑस्ट्रेलियाला 59 धावांवर भारताने तिसरा धक्का दिला. रनेशॉला (15) इंशात शर्माने पायचीत केले. 
 
त्यानंतर कर्णधार स्मिथच्या (21) धावांवर फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाने यष्टया वाकवल्या. जाडेजाने आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. पहिला डाव भारताने 603 धावांवर घोषित करुन ऑस्ट्रेलियावर 152 धावांची आघाडी घेतली.  चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन भारताने ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. भारताला आज विजयाची सर्वाधिक संधी असून सर्व मदार आता गोलंदाजांवर आहे.  चेतेश्वर पूजाराची व्दिशतकी खेळी (202), वृद्धीमान सहाचे शतक (117) आणि रविंद्र जाडेजाचे अर्धशतक (54) यांच्या फलंदाजीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेता आली. 
 
चेतेश्वरने द्रविडचा विक्रम मोडला!
पुजारा एका डावात ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने कारकिर्दीतील तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्यांदा द्विशतकी खेळी केली. पुजाराने द्विशतकी खेळीदरम्यान ५२५ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकारांच्या मदतीने २०२ धावा केल्या.
 
चेंडूंचा विचार करता सर्वांत मोठी खेळी करताना पुजाराने त्याचा आदर्श असलेल्या राहुल द्रविडचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. द्रविडने एप्रिल २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २७० धावांची खेळी करताना ४९५ चेंडू खेळले होते. पुजाराने पाच सत्रांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करताना खेळपट्टीवर ११ तास १२ मिनिट तळ ठोकला.
 
आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने २३३ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. साहा याने पुजारासोबत सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. जडेजाने ५५ चेंडूंमध्ये पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा फटकावीत भारताला दीडशेपेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली.

Web Title: Australia's 4 wickets, grip on India's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.