२७५ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी
By Admin | Updated: March 4, 2015 19:39 IST2015-03-04T19:28:28+5:302015-03-04T19:39:28+5:30
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तब्बल ४१७ धावा करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला

२७५ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी
>ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ४ - अफगाणिस्तानला ४१८ धावांचे आव्हान देत तब्बल २७५ धावांनी त्यांचा पराभव बुधवारी ऑस्ट्रेलियाने केला आहे.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तब्बल ४१७ धावा करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. सोबतीला अफगाणिस्तानचे ढिसाळ क्षेत्ररक्षण असल्याने ऑस्ट्रेलियाला धावसंख्यांचा डोंगर उभारणे सहज शक्य झाले. यापूर्वी भारताने २००७ साली बर्मुडा संघाविरुद्धच्या सामन्यात ४१३ धावा केल्या होत्या. अवघ्या ३७ षटकांत फक्त १४७ धावा करत अफगाणिस्तानचा सर्व संघ तंबूत परतला. नवरोझ मंगल या फलंदाजाने दोन चौकार व दोन षटकार लगावत ३५ चेंडूत ३३ धावा केल्या. परंतू, मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर खेळत असताना अॅरॉन फिन्चकडे झेल गेल्याने त्याला ३३ धावांवरच तंबतू परतावे लागले. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी १० चेंडूत फक्त २ धावा करत तंबूत परतला, तसेच दौलत झाद्रन या फलंदाजाला भोपळाही न फोडता आल्याने ऑस्ट्रेलिया मोठ्या फरकाने सामना जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले. मिचेल जॉन्सन या गोलंदाजाने अफगाणिस्तानचे ४ गडी बाद केले.