शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅथलिट पुरस्कार : ललिता, टिंटू, विकासला रोख पारितोषिक

By admin | Updated: June 9, 2015 02:18 IST

ललिता बाबर, टिंटू लुका, विकास गौडा आणि इंदरजितसिंग यांना क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रत्येकी साडेसात लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरात नुकत्याच झालेल्या २१व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णविजेते खेळाडू ललिता बाबर, टिंटू लुका, विकास गौडा आणि इंदरजितसिंग यांना क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रत्येकी साडेसात लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार भारताने या स्पर्धेत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ असे ५९ जणांचे पथक पाठविले होते. खेळाडूंनी चार सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई करून तिसरे स्थान पटकावले होते. ललिता बाबर हिने तीन हजार मीटर स्टीपल चेसमध्ये सुवर्ण पदकासह रिओ आॅलिम्पिकचे तिकीटही पक्के केले. टिंटूने ८०० मीटरमध्ये, विकास गौडा याने थाळीफेकीत तसेच इंदरजितसिंग याने गोळाफेकीत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या ४०० मीटर दौडीत रौप्यविजेती एम. आर. पुवम्मा, दहा हजार मीटर दौडीचा रौप्यविजेता जी. लक्षमणन, हेप्टथॉलनमधील रौप्यविजेती लिक्सी जोसेफ, ८०० मीटर पुरुष दौडीचा रौप्य विजेता जिन्सन जॉन्सन आणि २०० मीटरचा रौप्यविजेता धर्मवीर यांना प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले दौडीत रौप्यविजेत्या संघातील देवश्री मुजुमदार, टिंटू लुका, जिस्त्रा मॅथ्यू आणि एम. आर. पुवम्मा यांनादेखील प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. भारताच्या तीन खेळाडू कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. सर्वांना प्रत्येकी अडीच लाखांचा पुरस्कार दिला जाईल. या खेळाडूंमध्ये जी. लक्ष्मणन् (पाच हजार मीटर दौड), पौर्णिमा (हेप्टाथॉलन) आणि श्रावणी नंदा (२०० मीटर दौड) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)