Lovlina Borgohain : लवलिनाच्या पदकानं गावाचं नशिब बदललं, सरकारनं घरापर्यंत बनवला पक्का रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:32 PM2021-08-04T16:32:38+5:302021-08-04T17:00:04+5:30

Lovlina Borgohain : लवलिनाने जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलिनाने इतिहास रचत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते.

assam government gift to lovlina borgohain who won medal in tokyo olympics | Lovlina Borgohain : लवलिनाच्या पदकानं गावाचं नशिब बदललं, सरकारनं घरापर्यंत बनवला पक्का रस्ता 

Lovlina Borgohain : लवलिनाच्या पदकानं गावाचं नशिब बदललं, सरकारनं घरापर्यंत बनवला पक्का रस्ता 

Next

Tokyo Olympics 2020 : गुवाहाटी : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनाने इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये तिचा पराभव झाला असला तरी तिने देशासाठी कास्य पदक जिंकले आहे. सेमिफायनलमध्ये तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने लवलिनाचा पराभव केला. लवलिनाने जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलिनाने इतिहास रचत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते. (assam government gift to lovlina borgohain who won medal in tokyo olympics)

लवलिना आज कास्य पदकाचे रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळाले नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, कास्य पदक निश्चित केल्यानंतर लवलिनाच्या या कामगिरीनंतर आसाम सरकारने तिला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. तिच्या घरापर्यंत जाणारा पक्का रस्ता सरकारकडून तयार करण्यात आला आहे. स्थानिक आमदार बिस्वजीत फूकन यांनी लवलिनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बनवून घेतला आहे. 

लवलिनाबद्दल अभिमान असल्याने तिचे वडील टिकेन यांनी म्हटले आहे. लवलिनाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे, सरकारने रस्ता तयार केला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. कारण हे लवलिना आणि आमचे गाव या दोघांसाठी सरकारकडून बक्षीस दिल्यासारखे आहे, असे टिकेन यांनी सांगितले. तर तिच्या गावातील रहिवासी रितुराज म्हणाला, आसाम सरकारने लवलिनाला प्रगती करण्यास मदत केली आहे. तिच्या सरावाला मदत करण्यासाठी, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकूण 7 लाखांपैकी 5 लाख दिले आहेत. पहिल्या दिवशी जेव्हा तिला पदक मिळाले, तेव्हा स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि चांगली बातमी अशी आहे की, तेव्हापासून त्यांनी रस्ता  बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील  बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलिनाने मोठ्या संघर्षातून हे यश मिळवले आहे. लवलिना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलिनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलिनाने ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 

लवलिनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये
लवलिना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलिनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलिनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी  लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलिनाही किकबॉक्सिंगमध्ये आली. 

Web Title: assam government gift to lovlina borgohain who won medal in tokyo olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.