भारताला आशियाई स्नूकरचे अजिंक्यपद
By Admin | Updated: August 26, 2014 03:08 IST2014-08-26T03:08:03+5:302014-08-26T03:08:03+5:30
कमल चावला, फैसल खान व धर्मेंद्र लिलीचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत बेस्ट आॅफ फाईव्ह फ्रेम फायनलमध्ये ३-१ ने धूळ चारून आशियाई स्नूकर टीम चॅम्पियनशिपचा किताब जिंकला.

भारताला आशियाई स्नूकरचे अजिंक्यपद
नवी दिल्ली : कमल चावला, फैसल खान व धर्मेंद्र लिलीचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत बेस्ट आॅफ फाईव्ह फ्रेम फायनलमध्ये ३-१ ने धूळ चारून आशियाई स्नूकर टीम चॅम्पियनशिपचा किताब जिंकला.
माजी आयबीएफएफ विश्व स्नूकर चॅम्पियन मोहंमद आसिफ आणि माजी आशियाई स्नूकर चॅम्पियन मोहंमद सज्जाद भारताच्या चावला आणि फैसल यांचा मुकाबला करू शकले नाहीत़ त्याआधी भारतीय टीमने उपांत्य फेरीत इराणचा ३-१ गेमने पराभव केला होता़ फैसलने मोहंमद आसिफला ८१ चा ब्रेक लगावताना १०६-०० अशी धूळ चारली़ चावलाने सज्जादवर ९१-६ ने सरशी साधली,तर चावला आणि धर्मेंद्रची जोडी आसिफ आणि सज्जादकडून ८३-६७ ने पराभूत झाली; मात्र फैसलने सज्जादवर ५० ब्रेकच्या जोरावर ८३-४३ ने विजय मिळवीत भारताला किताब मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली़