शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 09:00 IST

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : नौकानयनमध्ये दोन कांस्यपदक पटकावली. भारताने नौकानयकमध्ये आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत.

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा दुसऱ्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली. नेमबाजांनी सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन पदकं जिंकली. नेमबाजीत 10m Men's Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर नौकानयनमध्ये दोन कांस्यपदक पटकावली. भारताने नौकानयकमध्ये आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत.

World Record! भारताचे ३ नेमबाज अव्वल आठात! पण, फायनलमध्ये फक्त दोघांना प्रवेश; असं का? 

नौकानयन पुरूष सांघिक गटात ( Rowing Men's Four) जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांनी भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारत ६:१०.८१ मिनिटांच्या वेळेसह तिसरा आला. त्यानंतर नौकानयनपटूंनी Men's Quadruple Sculls सांघिक गटात कांस्यपदक जिंकले. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे आजच्या दिवसाचे तिसरे पदक ठरले. २०१८च्या विजेत्या भारतीय संघाला ६:०८.६१ मिनिटाच्या वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ५.९६ सेकंदाच्या फरकाने त्यांना सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. चीनने सुवर्ण, तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. नौकानयन क्रीडा प्रकारातील भारताचे हे पाचवे पदक ठरले. 

- दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला- भारताचा जलतरणपटू श्रीहरी याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने २५.४३ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले अन् आता पदकासाठी उद्या तो शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल.  - जलतरणपटू विरधवल खाडे आणि आनंद एएस यांना ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करता नाही आले. विरधवल २३.१२ सेकंदासह १३व्या, तर आनंद २३.५४ सेकंदासह १८व्या स्थानावर राहिला.   

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ