शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

शेतकऱ्याच्या पोरानं पदक जिंकलं! ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने फायनलमध्ये रुद्रांक्ष पाटीलला नमवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 09:33 IST

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : आशियाई स्पर्धा २०२३च्या दुसऱ्या दिवसाची भारतीयांनी सुवर्ण सुरुवात केली. नेमबाजांनी १० मीटर ...

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : आशियाई स्पर्धा २०२३च्या दुसऱ्या दिवसाची भारतीयांनी सुवर्ण सुरुवात केली. नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. वैयक्तिक गटात ऐश्वर्यने कांस्यपदकाची कमाई केली. 

गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले

रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला. फायनलमध्ये टॉप ८ स्पर्धकांना संधी मिळते अन् दिव्यांश ६२९.६ गुणांसह आठवा आला, परंतु त्याला फायनलमध्ये प्रवेश नाही मिळाला. कारण, एका देशातील दोनच स्पर्धकांना फायनलमध्ये संधी मिळते. रुद्रांक्ष व ऐश्वर्य यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना अव्वल चारमध्ये आपले स्थान पटकावत भारतासाठी पदक निश्चत केले. 

सुवर्णपदकाच्या शर्यतीत भारताच्या नेमबाजांसमोर कोरियन आणि चीनच्या खेळाडूंचे आव्हान होते. या दोघांनी दमदार खेळ करताना २०८.७ गुण पटकावले आणि त्यामुळे टॉप थ्रीसाठी भारतीय खेळाडूंमध्ये शूट आऊट झालं. त्यात रुद्रांक्षला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २२८.८ गुणांसह ऐश्वर्यने कांस्यपदक निश्चित केले. 

कोण आहे ऐश्वर्यऐश्वर्यचा जन्म ३ फेब्रुवारी २००१ रोजी मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील रतनपूर गावात झाला. तीन भावंडांपैकी तो सर्वात धाकटा आहे. तो बऱ्याचदा त्याचे जमीनदार वडील वीर बहादूर यांच्याबरोबर शिकार करायला जात असे. चुलतभाऊ नवदीपसिंग राठौर यांच्याकडून त्याला नेमबाजी या खेळाबद्दल कळले. तोमरने २०१५ मध्ये भोपाळमधील मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीमध्ये वैभव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्रशिक्षण घेणे सुरू केले.  त्याने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघShootingगोळीबार