आशियाई क्रीडा स्पर्धा - भारताला सुवर्ण व कांस्य पदक
By Admin | Updated: September 20, 2014 10:05 IST2014-09-20T09:46:21+5:302014-09-20T10:05:24+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडत एक सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा - भारताला सुवर्ण व कांस्य पदक
ऑनलाइन लोकमत
इंचियोन, दि. २० - आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडत एक सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय नेमबाज जितू राय व श्वेता चौधरी यांनी ही कामगिरी केली असून जीतू रायला ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण तर श्वेता चौधरीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक पटकावले.
दक्षिण कोरियाच्या इंचियोन शहरात 17 व्या आशियाई स्पर्धा कालपासून सुरू झाली. नेमबाज श्वेताने १७६.४ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले. तर चीनच्या झेंग मेंग्युयानने सुवर्ण पदका जिंकले.
आशियाई क्रीडा स्पर्धेचे शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले. या सोहळ्यात यजमान राष्ट्राने सांस्कृतिक परंपरेचा परिचय देत नावाजलेल्या कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकली.