Asian Games 2023 Neeraj Chopra : गोल्डही आपलं अन् सिलव्हरही! नीरज चोप्राने इतिहास रचला, किशोर जेनाने पराक्रम केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 06:04 PM2023-10-04T18:04:53+5:302023-10-04T18:05:52+5:30

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७६ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली.

Asian Games 2023 Neeraj Chopra : Neeraj Chopra ( 88.88m ) & Kishore Kumar Jena  ( 87.54m) win Gold and Silver respectively for Indian in Men's Javelin Throw Final | Asian Games 2023 Neeraj Chopra : गोल्डही आपलं अन् सिलव्हरही! नीरज चोप्राने इतिहास रचला, किशोर जेनाने पराक्रम केला

Asian Games 2023 Neeraj Chopra : गोल्डही आपलं अन् सिलव्हरही! नीरज चोप्राने इतिहास रचला, किशोर जेनाने पराक्रम केला

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७६ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २६ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने ८८.८८ मीटर लांब ( सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. 


नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे दोन भारतीय पदकाच्या शर्यतीत होतेच. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुखापतीमुळे माघार घेतली, तो मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता होता. २०१८मध्ये नीरजने ८८.०६ मीटर लांब भालाफेक करून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तैपेईचा चेंग चाओ-त्सून हा ९० मीटरच्या वर भालाफेकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे आणि त्याचा आज पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, १५-२० मिनिटे झाले तरी त्याने नेमकं किती अंतर पार केले हेच दाखवले नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि तांत्रिक कारणामुळे त्याला पुन्हा भाला फेकावा लागला. त्यात त्याने ८२.३८ मीटर लांब भालाफेकला, पंचांच्या गोंधळाचा त्याच्या कामगिरीवर नक्कीच फरक जाणवला.


किशोरने पहिल्या प्रयत्नात ८१.७६ मीटर लांब भालाफेकून दुसरे स्थान पटकावले, परंतु त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात गोंधळ उडालेला पाहायला मिळला. तेव्हा त्याच्यासाठी नीरज पुढे आला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटर लांब भालाफेकून अव्वल स्थान कायम ठेवले. पण, किशोरने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७७ मीटर ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक भालाफेक करून अव्वल स्थानी झेप घेतली. या कामगिरीसह किशोरने पॅरीस ऑलिम्पिक २०२४ चेही तिकिट पक्के केले. नीरजने त्याच्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेक करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. किशोरने ८७.५४ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. 

Image
कोण आहे किशोर जेना?
ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील कोथासाही गावात जन्मलेल्या २८ वर्षीय किशोरने आज कमाल केली. त्याने ८६.७७ मीटर भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. २०२३मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते आणि त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेत ८४.३८ मीटर ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला ८४.७७ मीटरसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 

नीरज चोप्राची कामगिरी
सुवर्ण 
२०२० टोक्यो ऑलिम्पिक
२०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा
२०२२ डायमंड लीग
२०१८ आशियाई स्पर्धा
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा
२०१७ आशियाई अजिंक्यपद स्पर्धा

रौप्य 
२०२२ जागितक अजिंक्यपद स्पर्धा
२०२३ डायमंड लीग  

 

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results

Web Title: Asian Games 2023 Neeraj Chopra : Neeraj Chopra ( 88.88m ) & Kishore Kumar Jena  ( 87.54m) win Gold and Silver respectively for Indian in Men's Javelin Throw Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.