चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने ९ वर्षांनी 'सुवर्ण' जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:28 PM2023-10-06T17:28:56+5:302023-10-06T17:29:54+5:30

Asian Games 2023 Hockey : पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

 Asian Games 2023 Hockey : Chak De India! Indian men's hockey team won 'Gold' after 9 years, also qualified for Paris Olympics 2024, they beat Japan by 5-1 in finals  | चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने ९ वर्षांनी 'सुवर्ण' जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले 

चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने ९ वर्षांनी 'सुवर्ण' जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले 

googlenewsNext

Asian Games 2023 Hockey : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतक पार केले आहे. आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३७ कांस्य अशा एकूण ९१ पदकं जिंकली आहेत आणि ९ पदकं निश्चित केली आहेत. आज तिरंदाजीत भारताला पुरुष रिकर्व्ह गटाचे रौप्यपदक मिळाले, कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली. हॉकी फायनलमध्ये भारतीय पुरुष संघाच्या कामगिरीवर आज सर्वांच्या नजरा होत्या, कारण सुवर्णपदकासह पॅरिस ऑलिम्पिकचे ( Parish 2024) तिकीटही जिंकण्याची संधी भारताला होती. त्यांच्या मार्गात गतविजेत्या जपानचे आव्हान होते आणि ते सहज पार करून ९ वर्षांनी सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक पात्रताही निश्चित केली. 


१९५८ मध्ये भारताने ८-० अशा फरकाने जपानला नमवले होते आणि २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्याची पुनरावृत्ती केली होती. पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याचा पुरुष संघाचा प्रयत्न होता. फायनलमध्ये ५व्या मिनिटाला भारतीय खेळाडू गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु थोडक्यात हुकले. पहिल्या क्वार्टरमध्ये जपानचा बचाव मजबूत राहिला. शेवटच्या १ मिनिटाला भारताने १ गोल केला, परंतु रेफरीच्या शीटी वाजल्यानंतर तो प्रयत्न झाल्याने तो ग्राह्य धरला गेला नाही. भारताला पेनल्टी कॉर्नर मात्र मिळाला, परंतु हरमनप्रीत सिंगचा हा प्रयत्न जपाच्या गोलरक्षकाने सुरेखरित्या रोखला. 

दुसऱ्या क्वार्टरमध्ये मनप्रीत सिंगेने सर्कलमधून रिव्हर्स फटका मारून केलेल्या गोलने जपानच्या गोलरक्षकाला हतबल केले आणि भारताने आघाडी घेतली. त्यानंतर जपानकडून पलटवार झालेला पाहायला मिळाली, परंतु भारताचा गोलरक्षकाने एक अप्रतिम बचाव केला. भारताने पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी घेतली. ३२व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नवर भन्नाट गोल करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. ४ मिनिटांनी रोहिदास अमितने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करून जपानला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. आशियाई स्पर्धा इतिहासात जपानला एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही आणि आजही तसेच घडताना दिसले. ४८व्या मिनिटाला अभिषेकने सर्कलमधून अचूक गोल करून भारताची आघाडी ४-० अशी भक्कम केली. 


सामना संपायला १० मिनिटं शिल्लक असताना जपानकडून सेरेन टनाकाने गोल केला. शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताचा ५-१ असा विजय पक्का केला. 

Web Title:  Asian Games 2023 Hockey : Chak De India! Indian men's hockey team won 'Gold' after 9 years, also qualified for Paris Olympics 2024, they beat Japan by 5-1 in finals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.