शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का?

By स्वदेश घाणेकर | Updated: August 18, 2018 19:00 IST

Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली.

खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन शेजाऱ्यांमधील वाद जगजाहीर आहे, परंतु आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन देश एकत्र आले. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे मून जी-इन हे एकेकाळचे कट्टर वैरी सोहळ्याला एकमेकांच्या गळ्यातगळे घालताना दिसले. 

( Asian Games 2018 Opening Ceremony: संस्कृतीचे दर्शन अन् इतिहासाला उजाळा...)

आशियाई स्पर्धेत प्रथमच हे दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकत्रित पथसंचलन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाची उत्तर व दक्षिण अशी दोन देशांमध्ये विभागणी झाली. 25 जून 1950 मध्ये या दोन देशामंध्ये युद्धही झाले. 2010 पासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुधारण्याचा प्रयत्न सुरू झाले. पण, काही कारणास्तव त्यातही राजकीय विरोध होत होता, मात्र 2018च्या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने या कट्टर वैरींना एकत्र आणले. खेळाने दोन देशांना एकत्र आणल्याची ही पहिलीच वेळ असावी. सोहळ्याच्या पथकसंचलन सोहळ्यात दोन्ही देशांचे खेळाडू स्टेडियमवर आले, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. खेळाडूंनी कोणत्याही देशाचा ध्वज हातात घेतला नव्हता. पण, प्रत्येक खेळाडूंनी एकमेकांच्या हातात हात घालून संपूर्ण जगाला एकतेचा संदेश दिला. या स्पर्धेत दोन्ही देशांनी बास्केटबॉल, रोविंग व कॅनोइंग खेळात एकत्रित संघ उतरवला आहे. उत्तर आणि दक्षिण कोरियाने दिलेला हा एकजुटीचा संदेश जगाला नवी शिकवण देणारा आहे, पण भारतीय म्हणून मनात एक प्रश्न घर करत आहे. जे कोरियन देशांना जमले ते भारत आणि पाकिस्तान यांना कधी जमेल का? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय नेतेमंडळी तसा पुढाकार घेतील का? त्याही पलिकडे दोन्ही देशांतील जनता त्याचा स्वीकार करतील का?

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडाnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरिया