शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 21:17 IST

Asian Games 2018 LIVE Update: आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी खिंड लढवली.

भारतीय महिला हॉकी संघाला 21-0 असा दणदणीत विजय

 

 

 

भारताच्या पुरुष कबड्डी संघाने मिळवला थायलंडवर विजय

 

कुस्तीमध्ये दिव्याने पटकावले कांस्यपदक

 

 

 

#Sepaktakrawभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक. कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत

#Shooting संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. अखेरच्या प्रयत्नांत त्याला सातत्य राखण्यात अपयश आले, परंतु त्याने भारतासाठी पदक निश्चित केले. त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. राजपूतने 452.7 गुणांची कमाई केली. 

 

#Wrestling ग्रीको रोमन प्रकारात भारताचा कुस्तीपटू मनिषने 67 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने जपानच्या शिमोयामाडा त्सुचिकाचा 7-3 असा पराभव केला.

#Tennis सहाव्या मानांकित  अंकिता रैनाने जपानच्या होझुमी एरीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. #Shooting भारताला नेमबाजीत आणखी पदकाची अपेक्षा. संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 

- #Kabaddi भारतीय महिला संघाने अ गटात विजयी मालिका कायम राखताना उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी इंडोनेशियाचा 54-22 असा धुव्वा उडवला.

- #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सौरभ चौधरीला सुवर्णपदक

 

- #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्माला कांस्य

 #Women’s volleyball भारतीय महिला संघाचे स्थान धोक्यात. ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव. 

जकार्ता - #Shooting सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत सौरभने सहा राऊंडमध्ये 99, 99, 93, 98, 98 आणि 99 अशा एकूण 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले. 

 

 

आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी खिंड लढवली. कोल्हापूरचा जलतरणपटू विरधवल खाडेने 50 मीटर फ्री स्टाईल गटाच्या पात्रता फेरीत 22.43 सेकंदाची वेळ नोंदवली. त्याने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. 2010च्या ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत विरधवलने 50 मीटर बटरफ्लाय गटात कांस्यपदक जिंकले होते.

आशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या दत्तू भोकनळने पुरूष एकेरी स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने रेपेचेज राऊंडमध्ये 7 मिनिटे 45.71 सेकंदाची वेळ नोंदवली.  

कबड्डीत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय मिळवला. त्यांनी श्रीलंकेचा 38-12 असा एकतर्फी पराभव केला.तलवारबाजीत भारताच्या जस सीरत सिंगने महिला विभागात व्हिएतनामच्या ट्रॅन थी थूयचा 5-4 असा पराभव केला. 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाWrestlingकुस्तीShootingगोळीबारTennisटेनिस