आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन : भारताच्या आयुष शेट्टीचे ऐतिहासिक रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:13 IST2026-04-13T10:12:25+5:302026-04-13T10:13:33+5:30

Asian Championships Badminton : भारताच्या आयुष शेट्टी याला संपूर्ण स्पर्धेत राखलेला धडाका अंतिम सामन्यात कायम राखण्यात अपयश आल्याने त्याला आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, असे असले तरी त्याचे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले.

Asian Championships Badminton: India's Ayush Shetty wins historic silver medal | आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन : भारताच्या आयुष शेट्टीचे ऐतिहासिक रौप्यपदक

आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन : भारताच्या आयुष शेट्टीचे ऐतिहासिक रौप्यपदक

निंगबो (चीन)  - भारताच्या आयुष शेट्टी याला संपूर्ण स्पर्धेत राखलेला धडाका अंतिम सामन्यात कायम राखण्यात अपयश आल्याने त्याला आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, असे असले तरी त्याचे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले. १९६५ सालानंतर पहिल्यांदाच भारताने या स्पर्धेत एकेरी गटात पदक मिळवले.

जागतिक क्रमवारीत दुसरा असलेला क्रमांक दोन खेळाडू चीनचा विश्वविजेता शी यू की याच्याविरुद्ध आयुषचा ८-२१, १०-२१ असा पराभव झाला. यामुळे भारताचा या स्पर्धेतील पुरुष एकेरीतील सुवर्णपदकाची ६१ वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. बिगर मानांकित आयुषसाठी ही स्पर्धा उल्लेखनीय ठरली.

दिनेश खन्ना यांच्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो केवळ दुसरा भारतीय पुरुष ठरला. खन्ना यांनी १९६५ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी २०२३ मध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.

...असा रंगला सामना
पहिल्या गेममध्ये शी याने वर्चस्व गाजवत ४-० अशी आघाडी मिळवली. आयुषच्या स्मॅशमध्ये अचूकता नसल्याने तो २-६ असा पिछाडीवर राहिला. त्यानंतरही शी याने ११-६ अशी आघाडी घेतली. अखेरीस आयुष कडून झालेल्या चुका त्याला महागात पडल्या आणि शी याने पहिला गेम सहज जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये आयुषने दमदार सुरुवात करीत ३-१ अशी आघाडी घेतली. त्याने काही उत्कृष्ट बचाव आणि स्मॅशच्या जोरावर ७-२ अशी आघाडीही मिळवली. मात्र, ही आघाडी टिकवण्यात तो अपयशी ठरला.

शी याने पुनरागमन करीत ७-७ अशी बरोबरी साधली आणि नंतर ११-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम राखत सामना २१-१० असा जिंकला.

चुकांमुळे झाला पराभव
जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या आयुषने दमदार खेळ करीत अंतिम फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत अव्वल कुनलावुत वितिदसर्न, चौथ्या क्रमांकावरील जोनाथन ख्रिस्ती आणि सातव्या क्रमांकावरील ली शी फेंग यांचा पराभव केला होता. मात्र, शी यू की याच्या शिस्तबद्ध आणि रणनीतीपूर्ण खेळापुढे आयुषचा निभाव लागला नाही. चिनी खेळाडूने पूर्ण नियंत्रण ठेवत नेटजवळील खेळात वर्चस्व गाजवले आणि आयुषला चुका करण्यास भाग पाडले.

Web Title : एशिया बैडमिंटन चैंपियनशिप में आयुष शेट्टी का ऐतिहासिक रजत पदक

Web Summary : आयुष शेट्टी ने एशिया बैडमिंटन चैंपियनशिप में ऐतिहासिक रजत पदक जीता, जो 1965 के बाद एकल में भारत के लिए पहला पदक है। फाइनल में उन्हें चीन के शी यू क्यूई से हार का सामना करना पड़ा, जिससे भारत का 61 साल का स्वर्ण पदक का इंतजार खत्म हो गया। शेट्टी ने शीर्ष क्रम के खिलाड़ियों को हराया।

Web Title : Ayush Shetty's historic silver medal at Asia Badminton Championship.

Web Summary : Ayush Shetty secured a historic silver at the Asia Badminton Championship, a first for India in singles since 1965. He lost to China's Shi Yu Qi in the final, ending India's 61-year wait for gold. Shetty's impressive run included defeating top-ranked players.

टॅग्स :BadmintonBadminton