आशियाई बॅडमिंटन स्पर्धा: आयुष शेट्टी अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:07 IST2026-04-12T12:07:28+5:302026-04-12T12:07:44+5:30

Asian Badminton Championships: भारताच्या आयुष शेट्टीने अव्वल मानांकित आणि गतविजेता कुन्लावत वितिदसर्न याचा शनिवारी तीन गेममधील लढतीत पराभव करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Asian Badminton Championships: Ayush Shetty enters finals | आशियाई बॅडमिंटन स्पर्धा: आयुष शेट्टी अंतिम फेरीत

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा: आयुष शेट्टी अंतिम फेरीत

निंगबो  - भारताच्या आयुष शेट्टीने अव्वल मानांकित आणि गतविजेता कुन्लावत वितिदसर्न याचा शनिवारी तीन गेममधील लढतीत पराभव करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

विश्व क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या आयुषने पॅरिस ऑलिम्पिक रौप्य विजेता आणि २०२३ चा विश्वविजेता वितिदसर्न याच्यावर १०-२१, २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला. तो दिनेश खन्ना यांच्यानंतर ६० वर्षांनी या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

खन्ना यांनी १९६५ मध्ये पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी २०२३ मध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि 'सेंटर फॉर बॅडमिंटन एक्सिलन्स'चे संचालक विमल कुमार म्हणाले, 'आयुषने परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. त्याच्या आक्रमक खेळामुळे वितिदसर्नवर मानसिक दबाव आला आणि त्याचा आयुषने चतुराईने फायदा घेतला.'

वितिदसर्नने ४-० अशी आघाडी घेतल्यानंतर पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये आयुषने जोरदार पुनरागमन करीत वितिदसर्नकडून झालेल्या अनेक चुकांचा लाभ घेतला. बॅकहँड फ्लिकवर त्याने सहा गुण मिळवत दुसरा गेम जिंकला.

तिसऱ्या गेममध्ये २० वर्षांच्या आयुषने वितिदसर्नवर दबाव कायम ठेवताना १७-१० अशी आघाडी वाढविली. आक्रमक खेळाच्या जोरावर त्याने सलग मॅच पॉइंट मिळवून सामना जिंकला.

Web Title : आयुष शेट्टी ने एशियाई बैडमिंटन चैम्पियनशिप के फाइनल में जगह बनाई।

Web Summary : आयुष शेट्टी ने शीर्ष वरीयता प्राप्त कुनलावुत वितिदसर्न को हराकर एशियाई बैडमिंटन चैम्पियनशिप के फाइनल में प्रवेश किया। 1965 में दिनेश खन्ना के बाद वह 60 वर्षों में पुरुष एकल फाइनल में पहुंचने वाले पहले भारतीय हैं। शेट्टी ने 10-21, 21-19, 21-17 से जीत हासिल की।

Web Title : Ayush Shetty reaches Asian Badminton Championship final after stunning win.

Web Summary : Ayush Shetty stunned top seed Kunlavut Vitidsarn to reach the Asian Badminton Championship final. He is the first Indian in 60 years to reach the men's singles final, after Dinesh Khanna in 1965. Shetty won 10-21, 21-19, 21-17.

टॅग्स :BadmintonBadminton