आश्विन, जडेजा अव्वल पाचमध्ये
By Admin | Updated: December 16, 2015 03:37 IST2015-12-16T03:37:57+5:302015-12-16T03:37:57+5:30
रविचंद्रन आश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे, तर रवींद्र जडेजाने एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले आहे.

आश्विन, जडेजा अव्वल पाचमध्ये
दुबई : रविचंद्रन आश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे, तर रवींद्र जडेजाने
एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय अव्वल दहांमध्ये नाही, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्विन दुसऱ्या व जडेजा आठव्या स्थानी आहेत.
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपेक्षा तो तीन मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. मार्टिन गुप्तीलने १८ स्थानांची झेप घेतली आहे. (वृत्तसंस्था)