आश्विन, जडेजाने स्वत:ला सिद्ध केले : विराट कोहली
By Admin | Updated: February 25, 2015 01:23 IST2015-02-25T01:23:48+5:302015-02-25T01:23:48+5:30
टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांना विदेशी खेळपट्ट्यांवर लौकिकास साजेसा खेळ करता येत नाही

आश्विन, जडेजाने स्वत:ला सिद्ध केले : विराट कोहली
पर्थ : टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांना विदेशी खेळपट्ट्यांवर लौकिकास साजेसा खेळ करता येत नाही, अशी अनेकांनी टीका केली होती; मात्र वर्ल्डकपमध्ये या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले, असे मत स्टार फलंदाज विराट कोहली याने व्यक्त केले आहे़
कोहली पुढे म्हणाला, की वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आश्विन आणि जडेजा यांनी विजयात विशेष योगदान दिले होते़ या दोन्ही खेळाडूंनी मिळून आतापर्यंत ६ गडी बाद केले आहेत़ यापुढेही हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावतील. इतर गोलंदाजांचीही त्यांना साथ मिळत आहे़ त्यामुळे कोणताही प्रतिस्पर्धी असो आमचे गोलंदाजच त्यांच्यावर वर्चस्व गाजवतील़ (वृत्तसंस्था)