आश्विन दुखापतग्रस्त : हरभजनचा वन-डे संघात समावेश
By Admin | Updated: October 12, 2015 00:01 IST2015-10-12T00:01:17+5:302015-10-12T00:01:17+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीदरम्यान आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन दुखापतग्रस्त झाल्यामुळे अनुभवी आॅफस्पिनर हरभजन सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.

आश्विन दुखापतग्रस्त : हरभजनचा वन-डे संघात समावेश
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीदरम्यान आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन दुखापतग्रस्त झाल्यामुळे अनुभवी आॅफस्पिनर हरभजन सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या हरभजनला वन-डे संघात स्थान मिळाले नव्हते, पण ग्रीन पार्कमध्ये आश्विन दुखापतग्रस्त झाल्यानंतर हरभजनचा संघात समावेश करण्यात आला. आश्विनला ग्रीनपार्कमध्ये केवळ ४.४ षटके गोलंदाजी करता आली.
वैद्यकीय अहवालानंतर आश्विनच्या उपलब्धतेबाबत स्पष्ट होईल. बीसीसीआयने स्पष्ट केले, की कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर आज दक्षिण
आफ्रि केविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यादरम्यान अािश्वनला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी किती कालावधी लागले, हे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून लवकरच स्पष्ट करण्यात येईल.
भारताला टी-२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला, तर ईडनगार्डन्सवरील अखेरची लढत पावसामुळे रद्द झाली. आश्विनने टी-२० मालिकेत भारतातर्फे चमकदार कामगिरी करताना चार बळी घेतले होते.