विराटसाठी आश्विन बनला संकटमोचक
By Admin | Updated: March 5, 2015 23:27 IST2015-03-05T23:27:11+5:302015-03-05T23:27:11+5:30
फिरकी गोलंदाज आऱ आश्विन याने लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाचे कौतुक करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे़

विराटसाठी आश्विन बनला संकटमोचक
पर्थ : विराट कोहलीच्या पत्रकार शिवीगाळ प्रकरणावर सर्वत्र चर्चा सुरू असताना टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आऱ आश्विन याने लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाचे कौतुक करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे़
आश्विनने कोहलीच्या वादावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही़ मात्र, त्याच्या बोलण्यावर तो या प्रकरणाला शमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले़
आश्विन पुढे म्हणाला की, मीडिया येथे आमचे समर्थन करण्यासाठी आला आहे़ हे बघून आनंद झाला आहे़ एवढ्या दूर देशात माध्यमांचा उत्साह कौतुकास्पद आहे़ विशेष म्हणजे भारतात क्रिकेटला पाठिंबा देणे आणि क्रिकेट या खेळाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविणे यामध्ये मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे़
कोहली वादावर आश्विन म्हणाला की, कोहली आणि त्या पत्रकारात काय झाले हे मला माहीत नाही़ वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने सांगितले की, मला माध्यमातून विराट आणि पत्रकाराच्या प्रकरणाची माहिती झाली आहे़ त्यामुळे यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही़ (वृत्तसंस्था)