दुखापतीमुळे आशिष नेहरा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार
By Admin | Updated: April 13, 2016 11:17 IST2016-04-13T11:17:20+5:302016-04-13T11:17:20+5:30
आयपीएलमधील पहिलाच सामना खेळताना सनरायझर्स हैदराबादचा आघाडीचा गोलंदाज आशिष नेहरा जायबंदी झाला आहे.

दुखापतीमुळे आशिष नेहरा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - आयपीएलमधील पहिलाच सामना खेळताना सनरायझर्स हैदराबादचा आघाडीचा गोलंदाज आशिष नेहरा जायबंदी झाला आहे. दुखापतीमुळे आशिष नेहराला आयपीएलच्या पुढच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात नेहरा जायबंदी झाला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने आशिष नेहरा पुढचे काही सामने खेळू शकणार नसल्याची माहिती दिली. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादवर ४५ धावांनी विजय मिळवला. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता.
तेरा चेंडू टाकल्यानंतर दुखापत बळावल्याने नेहराने मैदान सोडले. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये नेहराने भारताची गोलंदाजीची धुरा संभाळत महत्वाची भूमिका बजावली होती. फिटनेसच्या समस्येमुळेच नेहराला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घ्यावी लागली होती.