आशियाड जोड १
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:36+5:302014-10-04T22:55:36+5:30
ंआशियाड जोड १

आशियाड जोड १
ं शियाड जोड ११९९८ साली बँकॉक आशियाडमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या हॉकी संघाला या जेतेसोबतच रियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले, हे विशेष. याशिवाय पुरुष कम्पाऊंड तिरंदाजी, मेरिकोम, योगेश्वरदत्त, पुरुष स्क्वॅश संघ, सानिया मिर्झा, साकेत मायनेनी, सीमा पुनिया आणि चार बाय ४०० मीटरचा महिला रिले संघ सुवर्णांचा मानकरी ठरला आहे. योगेश्वर येथे कुस्तीचे सुवर्ण जिंकण्याच्या इराद्याने उतरला. त्याने २८ वर्षांचा दुष्काळ संपविला. लंडन ऑलिम्पिकचा कांस्य विजेत्या या मल्लाने फ्रीस्टाईलच्या ६५ किलो गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंचे मोडित काढलेले आव्हान वाखाणण्यासारखे होते. स्क्वॅश पुरुष हकेरीत सौरव घोषाल आणि नेमबाजीत जितू राय यांचे यशदेखील नजरेआड करता येणार नाही. पिस्तूलमध्ये जसपाल राणानंतर सुवर्ण जिंकणारा जितू दुसरा भारतीय ठरला. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा केवळ कांस्य जिंकू शकला, तर गगन नारंगला पदकाविना परतावे लागले. सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्याकडून घोर निराशा झाली.टेनिसमध्ये सोमदेव, लियांडर आणि रोहन यांच्या अनुपस्थितीमुळे देशाला धक्का बसला. पण सायनाने ही उणीव भरून काढून मिश्र प्रकारात जोडीदारासोबत सुवर्ण तर प्रार्थना ठोंबरेच्या सोबतीने महिला दुहेरीचे कांस्य जिंकले. पुरुष एकेरीत युकीला कांस्य आणि दुहेरीत युकी-दिविज शरण यांनी कांस्य जिंकले. भारताचे पुरुष आणि महिला तिरंदाज रिकर्व्ह प्रकारात एकही पदक जिंकू शकले नाही. कम्पाऊंडमध्ये मात्र पुरुष संघाने द.कोरियाला नमवून पहिले सुवर्ण जिंकले. याच प्रकारात भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचीदेखील कमाई झाली.