शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सुवर्ण जिंकलं; पण बक्षिसांचे वादे अजून हवेतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 08:50 IST

Arshad Nadeem : अनेक आर्थिक विवंचना असतानाही त्यानं आपला सराव सुरू ठेवला आणि शेवटी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंच. ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडताना त्यानं नव्वद मीटरच्या पलीकडे म्हणजे ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकला. अर्शदचं हे यश खरोखरच मोठं होतं.

२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राला हरवून पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं आणि पाकिस्तानात एकच जल्लोष झाला. कारण पाकिस्तानचं हे आतापर्यंतच पहिलंच वैयक्तिक सुवर्णपदक होतं. अर्शदनं ज्या परिस्थितीत हे सुवर्णपदक पटकावलं, त्याचंही मोल खूपच मोठं होतं. अगदी ऑलिम्पिक स्पर्धेला जाईपर्यंतही त्याला चांगल्या भाल्यासाठी वणवण करावी लागली. अनेक आर्थिक विवंचना असतानाही त्यानं आपला सराव सुरू ठेवला आणि शेवटी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंच. ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडताना त्यानं नव्वद मीटरच्या पलीकडे म्हणजे ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकला. अर्शदचं हे यश खरोखरच मोठं होतं. सततच्या हालअपेष्टांनी आणि आर्थिक विवंचनांनी जर्जर असलेला पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेलाही अर्शदच्या या कामगिरीनं आनंद झाला नसता तरच नवल. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि इतर खासगी संस्था, उद्योगपतींनीही अर्शदनं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावताच त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. 

या साऱ्यामुळे अर्शदच्या पाठीमागे लागलेलं आर्थिक शुक्लकाष्ठ एकदाचं संपलं असेल. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्शदनं या बक्षिसांमागचं रहस्यही उघड केलं. सरकारनं जाहीर केलेल्या बक्षिसांची रक्कम तर त्याला मिळाली; पण ज्या खासगी संस्थांनी मोठ्या रुबाबात मोठमोठ्या आकड्यांच्या बक्षिसाची जी रक्कम जाहीर केली होती, त्यातल्या बऱ्याच जणांनी अजून बक्षिसाची ही रक्कम देण्याचं नाव घेतलेलं नाही. बक्षिसाच्या रकमा जाहीर करून त्यांनी स्वत:चं कौतुक तर करून घेतलं, दानशूरपणाचा मोठा आवही आणला, पण ही रक्कम देण्यात अजून तरी त्यांनी हात आखडताच घेतलेला आहे. ही रक्कम मला कधी मिळेल आणि मिळणार नाही, याबद्दल मला काहीही माहीत नाही, असं अर्शदनं थेटच सांगितलं. पाकिस्तानच्या ‘वॉटर ॲण्ड पॉवर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (WAPDA) या संस्थेनं अर्शदला दहा लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं, तर LESCO या संस्थेनं अर्शदच्या प्रमोशनसाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय इतरही काही संस्थांनी ‘उदार’ हस्ते अर्शदवर बक्षिसांची उधळण केली होती; पण अजूनपर्यंत त्यातल्या अनेकांनी एक पैसाही अर्शदला दिलेला नाही. 

भरीस भर म्हणजे अर्शदची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे, तो गरीब नाही, असा अपप्रचारही काहींनी केला. त्याला उत्तर देताना अर्शदनं म्हटलं, मी किती ‘श्रीमंत’ आहे, हे मला आणि जे मला ओळखतात त्या साऱ्यांनाच ठाऊक आहे. मी खरंच ‘श्रीमंत’ आहे. माझा खेळ आणि माझी आजवरची पदकं हीच माझी आजवरची संपत्ती आणि श्रीमंती आहे. त्याचा मला अभिमान आहे. खेळण्यासाठी मी जोपर्यंत उधार-उसणवाऱ्या करत होतो, कर्ज काढत होतो, तेव्हाही मी माझ्या खेळापोटी असलेल्या ध्येयानं आणि मेहनतीनं श्रीमंतच होतो; पण सरकारनं जेव्हा मला आर्थिक मदत सुरू केली, त्यावेळी स्पर्धेसाठी आणि खेळासाठी पैशांचा विचार मला फारसा करावा लागला नाही, हेदेखील खरं आहे. कारण माझ्या खेळाच्या खर्चाचा भार मग सरकारनं उचलला. जे माझ्या ‘श्रीमंती’चे दाखले सोशल मीडियावर देताहेत, त्यांना माझ्यावरच्या कर्जाचे आकडे बँकांच दाखवतील, या शब्दांत त्यानं आपल्यावर सुरू असलेल्या खोट्या आरोपांचा समाचार घेतला. 

मी फक्त देशासाठी खेळलो आणि खेळतो आहे, अर्थातच त्यामुळे माझंही नाव मोठं झालं, हे खरं आहे; पण मला बदनाम करण्यासाठी लोकांनी इतक्या खालच्या पातळीला जावं याबद्दल मला फार दु:ख झालं, असंही अर्शदनं बोलून दाखवलं. ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकानंतर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव तर झाला, पण त्यामागची वस्तुस्थिती हीदेखील आहे. महत्त्वाचं म्हणजे टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम (प्राइज मनी) मिळत नव्हती, पॅरिस ऑलिम्पिकपासून ॲथलेटिक्स आणि बॉक्सिंगसारख्या काही खेळांतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम दिली जात आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शदला ५० हजार डॉलर्स (पाकिस्तानी एक कोटी ४० लाख रुपये) देण्यात आले होते. 

सुवर्ण जिंकल्यावर सासऱ्यानं दिली म्हैस!ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर पाकिस्तानी जनतेच्या मनात अर्शदविषयीचा अभिमान वाढला आहे. तेव्हापासून सगळीकडे त्याचं गुणगान सुरू आहे. अर्शदची स्वत:ची आर्थिक परिस्थिती तर बेतास बात होतीच; पण त्याची सासुरवाडीही सर्वसामान्यच आहे. अर्शदनं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्या सासऱ्यानं, मोहम्मद नवाज यांनीही मोठ्या अभिमानानं त्याला म्हैस भेट दिली! पाकिस्तानच्या ग्रामीण भागात एखाद्याचा सन्मान करण्यासाठी त्याला म्हैस भेट दिली जाते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Trendingजगातील घडामोडी