अर्जुन-श्लोकला जेतेपद

By Admin | Updated: February 13, 2017 00:08 IST2017-02-13T00:08:42+5:302017-02-13T00:08:42+5:30

अर्जुन मादाथील रामचंद्रन आणि रामचंद्रन श्लोक या युवा भारतीय जोडीने रविवारी येथे २६ व्या इराण फज्र बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद

Arjuna-Shloka won the title | अर्जुन-श्लोकला जेतेपद

अर्जुन-श्लोकला जेतेपद

तेहरान : अर्जुन मादाथील रामचंद्रन आणि रामचंद्रन श्लोक या युवा भारतीय जोडीने रविवारी येथे २६ व्या इराण फज्र बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
द्वितीय मानांकित भारतीय जोडीने अवघ्या २५ मिनिटांतच केनास अदी हरयांतो आणि मोहम्मद रेजा पहलेवी या इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जोडीवर ११-८, ११-८, ११-९ असा विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
जागतिक क्रमवारीतील ६६ वी मानांकित जोडी आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी ही पहिली जोडी आहे. या जोडीचे हंगामाच्या सुरुवातीला मलेशिया ग्रां.प्री. गोल्डच्या दुसऱ्या फेरीत आणि सय्यद मोदी ग्रां.प्री. गोल्डच्या सुरुवातीलाच आव्हान संपुष्टात आले होते. या दोघांनी नेपाळ आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते आणि गेल्या वर्षी टाटा इंडिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळवले होते.

Web Title: Arjuna-Shloka won the title