अर्जेंटिना संघाच्या सामानाची चोरी

By Admin | Updated: July 31, 2016 05:49 IST2016-07-31T05:49:01+5:302016-07-31T05:49:01+5:30

अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या हॉटेलच्या खोलीतून सामान आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार संघ व्यवस्थापनाने पोलिसांकडे केली

Argentina team baggage theft | अर्जेंटिना संघाच्या सामानाची चोरी

अर्जेंटिना संघाच्या सामानाची चोरी


प्युबेला : रिओ आॅलिम्पिकसाठी आलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या हॉटेलच्या खोलीतून सामान आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार संघ व्यवस्थापनाने पोलिसांकडे केली आहे. संघ एका मैत्री सामन्यासाठी हॉटेलबाहेर असताना ही घटना घडल्याची माहिती अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष क्लाऊडियो तापिया यांनी दिली. सामना संपल्यानंतर खेळाडू उशिरा रात्री हॉटेलवर परतताच सामना आणि रोख रक्कम कुणीतही चोरल्याचे आढळून आले. रोख रक्कम किती होती, हे अद्याप निष्पन्न झाले नाही. आम्हाला नुकसानभरपाई मिळेस्तोवर हॉटेल सोडणार नाही, अशी धमकी क्लाऊडियो यांनी दिली आहे.

Web Title: Argentina team baggage theft