शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:31 IST

Archery: भारतीय तिरंदाज अंकिता भकतने शुक्रवारी आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सुहयोनला पराभूत करत मोठा उलटफेर घडवला आणि सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, धीरज बोम्मादेवरा याने देखील पुरुष रिकर्व्ह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

ढाका - भारतीय तिरंदाज अंकिता भकतने शुक्रवारी आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या नाम सुहयोनला पराभूत करत मोठा उलटफेर घडवला आणि सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, धीरज बोम्मादेवरा याने देखील पुरुष रिकर्व्ह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अंकिताने पाच सेटच्या आव्हानात्मक फायनलमध्ये ७-३ ने विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय नोंदवून महिला रिकर्व्ह स्पर्धा जिंकली. पुरुष गटात धीरजने अंतिम सामन्यात देशबांधव राहुलला ६-२ ने हरवून पहिले स्थान मिळविले. भारतीय संघाने या अभियानाचा समारोप १० पदकांसह केला, ज्यात सहा सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यामुळे भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. यापूर्वी अंकिताने उपांत्य फेरीत आपली वरिष्ठ सहकारी आणि जगातील माजी नंबर एक तिरंदाज दीपिकाकुमारीला पराभूत केले होते. दोन्ही खेळाडू ५-५ ने बरोबरीत होत्या आणि शूट-ऑफमध्येही दोघांनी नऊ-नऊ गुण मिळविले. परंतु, अंकिताचा तीर केंद्राच्या अधिक जवळ असल्याने तिने अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात अंकिताने पहिला सेट २९-२७ ने जिंकला. दुसरा सेट २७-२७ ने बरोबरीत राहिला. नामने तिसरा सेट २८-२६ ने जिंकून बरोबरी साधली. मात्र, चौथ्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजाने शानदार पुनरागमन करत २९-२८ च्या प्रयत्नाने ५-३ ची आघाडी घेतली. या भारतीय खेळाडूने निर्णायक सेटमध्येही उत्कृष्ट खेळ दाखवत सुवर्णपदक जिंकले. भारताने संगीतामुळे महिला रिकर्व्हचे कांस्यपदकही मिळविले. तिने दीपिकाकुमारीला पराभूत केले.

भारताला ऐतिहासिक सुवर्णभारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने अलीकडच्या काळातील आपला सर्वांत रोमांचक खेळ करत शुक्रवारी दक्षिण कोरियाला अत्यंत अटीतटीच्या शूट-ऑफमध्ये हरवून १८ वर्षांत पहिल्यांदाच आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद सुवर्ण जिंकले.  यशदीप भोगे, अतानू दास व राहुल या त्रिकुटाने २-४ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन केले. त्यांनी सेओ मिंगी, किम येचन व जंग जिहो या कोरियन संघाला ५-४ असे नमवत २००९ पासून या स्पर्धेतील कोरियाचे वर्चस्वही संपुष्टात आणले. दोन्ही संघांनी शूट-ऑफमध्ये २९ गुण मिळविले;  दासने अनुभवाच्या जोरावर निर्णायक क्षणी १० गुण मिळवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Archery: Ankita Bhakat, Dheeraj Bommadevara win gold medals!

Web Summary : Ankita Bhakat and Dheeraj Bommadevara secured gold medals at Asian Archery Championship. Ankita upset South Korea's Nam Su-hyeon. Indian team finished top with 10 medals.
टॅग्स :Indiaभारत