राज्य स्पर्धेसाठी नगर संघ जाहीर
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:23+5:302015-03-06T23:07:23+5:30
अहमदनगर : औरंगाबाद येथे होणार्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी नगरचा संघ निवड चाचणीद्वारे जाहीर करण्यात आला़

राज्य स्पर्धेसाठी नगर संघ जाहीर
अ मदनगर : औरंगाबाद येथे होणार्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी नगरचा संघ निवड चाचणीद्वारे जाहीर करण्यात आला़ येथील पेमराज सारडा महाविद्यालयात बुधवारी ही निवड चाचणी झाली़ या निवड चाचणीसाठी जिल्हाभरातील १२५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता़ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कुराश संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी संजय धोपावकर, सोनाली नागर, हर्षल कांबळे, अंकुश नागर, सोनाली साबळे आदी उपस्थित होते़ मुलांच्या संघात आदित्य धोपावकर, अंकिता सोनवणे, गणेश लांगडे, आदित्य सैद, स्वप्निल पाठक, प्रसाद गायकवाड, सतीश शिंदे, भूषण शिंदे, फैय्याज सय्यद तर मुलींच्या संघात ऐश्वर्या धोपावकर, वैष्णवी शेलार, खुशबू टकले, प्रियंका कोरडे, अश्विनी काळे, तेजलक्ष्मी धोपावकर, कल्याणी ढवण, शिल्पा मत्रे आदींची निवड करण्यात आली़ राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे होणार आहे़