आयपीएल 2016चं वेळापत्रक जाहीर
By Admin | Updated: March 11, 2016 14:05 IST2016-03-11T14:05:57+5:302016-03-11T14:05:57+5:30
इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) 2016 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल

आयपीएल 2016चं वेळापत्रक जाहीर
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ११ - इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) 2016 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. 9 एप्रिलला सर्वात पहिला सामना वानखेडेवर खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्या सामन्याने आयपीएलला सुरुवात होईल.
51 दिवस चालणा-या या आयपीएलमध्ये या मोसमात एकूण 60 सामने होणार आहेत. 29 मे रोजी वानखेडे स्टेडिअमवरच अंतिम सामना खेळवला जाईल. एकूण 10 ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये मोहाली, दिल्ली, नागपूर, पुणे, बंगळुरु, हैद्राबाद, कोलकाता, राजकोट आणि रायपूर या शहरांचा समावेश आहे.