अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:50 AM2024-04-04T05:50:51+5:302024-04-04T05:51:14+5:30

Kazakhstan Badminton Championships: युवा बॅडमिंटन खेळाडू अनमोल खरब (Anmol Kharab) हिने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिचे आव्हान मोडीत काढले. यासह अनमोलने कझाखिस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 

Anmol Kharab in quarter-finals, Kazakhstan Badminton Championships | अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड

अनमोल खरब उपउपांत्यपूर्व फेरीत, कझाखिस्तान बॅडमिंटन स्पर्धेत घोडदौड

अस्ताना - युवा बॅडमिंटन खेळाडू अनमोल खरब हिने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिचे आव्हान मोडीत काढले. यासह अनमोलने कझाखिस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक चॅम्पियनशिपची सुवर्ण विजेती आणि सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन १७ वर्षांच्या अनमोलने मालविकाचा ५९ मिनिटांत  २१-१३, २२-२० असा पराभव केला. 
जागतिक क्रमवारीत ३३३व्या स्थानावर असलेली अनमोल पुढील फेरीत इंडोनेशियाची २१ वर्षांची नुरानी रातू अजाहारा हिच्याविरुद्ध खेळेल. अन्य एका सामन्यात अनुपमा उपाध्यायने हर्षिता राऊतचा २१-१३, २१-१३ असा पराभव केला.

Web Title: Anmol Kharab in quarter-finals, Kazakhstan Badminton Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.