राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 10:42 PM2019-12-05T22:42:20+5:302019-12-05T22:44:27+5:30

मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली.

Ankushita Boro in the quarterfinals in the National Boxing Championship | राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत

googlenewsNext
ठळक मुद्देपंजाबच्या गगनदीप कौरने 5-0 अशी चमक दाखवली नंतर महाराष्ट्राच्या मनिषा ओझाने आपली छाप पाडली.

 कुन्नूर : इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी आणि माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरोने आज केरळमधील मुंडयाद इंडोर स्टेडियमवर झालेल्या चौथ्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश्ग केला.आरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणा-या आसामच्या कचारीने 81 किलो गटात मध्य प्रदेशच्या 2018 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या जिग्यासा राजपूतचे आव्हान  5-0 असे
संपुष्टात आणले.हिमाचल प्रदेशच्या एरिका शेखरविरुद्धच्या लढतीत कचारीच्या राज्यातील अंकुशिता बोरोने 5-0 असा विजय नोंदवत आगेकूच केली.


गेल्या वर्षीची रौप्यपदक जिंकणारी हरियाणाची नुपूर हिमाचल प्रदेशच्या संध्या विरुद्ध 75 किलो वजनीगटाच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला व  नुपुरने 5-0 असा एकहाती विजय नोंदवला.आशियाई चँपियनशिपनंतर नुपूर प्रथमच रिंगमध्ये पुनरागमन करीत होती. तमिळनाडूच्या आर. प्रियदर्शिनीच्या  64 किलो गटातील लढतीत राऊंड 1 मध्ये रेफरी स्टॉप कॉन्टेस्ट (आरएससी) ने विजय मिळविल्यानंतर मिझोरमच्या अबीसाक वन्लालमवीने चमक दाखवली.  मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली. उत्तर प्रदेशच्या आराधना पटेल यांना राऊंड 2 मध्ये आरएससीच्या जागी विजयी घोषित करण्यात आले होते. प्रथमच भाग
घेतलेल्या लडाखलाही धक्का बसला होता, कारण फरिना लल्यासला केरळच्या अन्सुमोल बेनीने पहिल्या फेरीत आरएससी पद्धतीने विजय मिळवला.


दिल्लीच्या अंजली (69 किलो) आणि शलाखा सिंग संनसवाल (75 किलो) दोघींनी पुढच्या फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. पंजाबच्या गगनदीप कौरने 5-0 अशी चमक दाखवली नंतर महाराष्ट्राच्या मनिषा ओझाने आपली छाप पाडली.आंध्र प्रदेशकडून गोम्पा गेया रुपीनी (81 किलो) राऊंड 1 च्या विजयात आरएससीमार्फत अंतिम-आठमध्ये स्थान मिळविले. तेलंगणाच्या सारा कुरेशीला 81 किलो वजनीगटात
हरयाणाच्या निर्मलाविरुद्ध वॉकओव्हर मिळाला. स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांना 6 डिसेंबरपासून सुरुवात होईल तर, अंतिम सामने 8 डिसेंबरला पार पडतील.

Web Title: Ankushita Boro in the quarterfinals in the National Boxing Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.