शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अँडी मरेचे दिमाखदार जेतेपद

By admin | Updated: November 8, 2016 03:45 IST

जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने धमाकेदार कामगिरी करून पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले

पॅरिस : जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने धमाकेदार कामगिरी करून पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. अमेरिकेच्या जॉन इस्नरला तीन सेटमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात नमवून मरेने दिमाखात विजेतेपद उंचावले. सर्बियाच्या जोकोविचला पिछाडीवर टाकून एटीपी क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहोचलेल्या मरेने पॅरिसमध्येही पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली. तसेच यंदाच्या मोसमात मरेचे हे आठवे विजेतेपद असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने एकूण १४वे मास्टर्स जेतेपद पटकाविले आहे. त्याचबरोबर, यंदा वर्षाअखेरीस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत मरे अव्वल मानांकित खेळाडू म्हणून खेळेल. लंडन येथील ओटू एरिना येथे १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या मरेने दमदार खेळ करताना पॅरिस मास्टर्सच्या अंतिम सामन्यात इस्नरला आपला खेळ करण्याची फारशी संधी दिली नाही. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मरेने ६-३, ६-७, ६-४ अशी दमदार बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले. स्कॉडलंडचा रहिवासी असलेल्या मरेसाठी यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले आहे. आॅगस्ट महिन्यात झालेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये त्याने पुरुष एकेरीचे सुवर्ण पटकावून सलग दोनवेळा आॅलिम्पिक सुवर्ण पटकावणारा पहिला टेनिसपटू म्हणून इतिहास रचला. फ्रेंच ओपनमध्ये पराभूत झाल्यानंतर मरेने गत आठपैकी सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)