शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅँडरसनने मोडला कपिल देवचा विक्रम

By admin | Updated: May 21, 2016 21:56 IST

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची दाणादाण उडवलेल्या जेम्स अँडरसन याने ५ बळी मिळविताना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविला.

ऑनलाइन लोकमत

हेडिंग्ले, दि. २१ : पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची दाणादाण उडवलेल्या जेम्स अँडरसन याने ५ बळी मिळविताना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविला. या शानदार कामगिरीसह अँडरसनने भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा सर्वाधिक ४३४ बळींचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले.

लंकेविरुद्ध पहिल्या डावात ५ बळी घेताना अँडरसनने आपल्या बळींची संख्या ४३८ इतकी केली. सामन्यात कौशल सिल्वाला बाद करून अँडरसनने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर यानंतर अँजेलो मॅथ्यूजला बाद करून ही विक्रमी कामगिरी नोंदवली.

अँडरसनने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांत 29.18च्या सरासरीने 438 बळी घेतले आहेत. कपिल देव यांनी २२७ डावांमध्ये ४३४ बळी घेतले होते, तर अँडरसनने हीच कामगिरी २१३ डावांमध्ये केली. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन असून, त्याने १३३ कसोटी सामन्यात तब्बल ८०० बळी घेतले आहेत. तर, भारताचा माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे ६१९ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.