... अन् सचिनने काढली सेल्फी
By Admin | Updated: February 22, 2015 15:03 IST2015-02-22T14:57:45+5:302015-02-22T15:03:47+5:30
रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी मेलबर्न स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता व सचिनला बघताच मैदानातील प्रेक्षकांनी सचिन...सचिन असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
... अन् सचिनने काढली सेल्फी
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २२ - मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदाच्या विश्वचषकात खेळत नसला तरी मैदानात मॅच बघण्यासाठी आलेल्या सचिनच्या एका झलकनेही प्रेक्षक सुखावतात. रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी मेलबर्न स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता व सचिनला बघताच मैदानातील प्रेक्षकांनी सचिन...सचिन असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सामन्या दरम्यान सचिनने सेल्फीही काढली.
वर्ल्डकप २०१५ मध्ये भारतीय संघ सचिन तेंडुलकरविना मैदानात उतरला आहे. सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या सचिनची उणीव क्रिकेटप्रेमींना आजही जाणवत असते. क्रिकेटच्या देवाची प्रेक्षकांवरील जादू तसूभरही कमी झालेली नाही. रविवारी दक्षिणआफ्रिकाविरुद्धचा सामना बघण्यासाठी सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये उपस्थित होता. स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर सचिन दिसताच भारतीय संघाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे हा जल्लोष सुरु असताना ना कोणत्याही फलंदाजांची चौकार मारला होता ना कोणत्या संघाची विकेट गेली. सचिनला बघून प्रेक्षक जल्लोष करत होते आणि मैदानात सचिन सचिन अशा घोषणा सुरु होत्या.प्रेक्षकांकडून जोरदार स्वागत झाल्यावर सचिनने सेल्फीही काढली.