शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

अमरावतीच्या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 6:03 PM

आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत राजकारण : डिसेंबरअखेर होणार होते आयोजन

ठळक मुद्देक्रीडा ध्वज उतरविताना पुढील स्पर्धांचे आयोजन निश्चित केले जाते.जबाबदार अधिकाऱ्यांकडे हे क्रीडा ध्वज सोपविण्याची परंपरा आहे.अमरावती अपर आयुक्तांकडे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत ध्वज सोपविले, हे विशेष.

अमरावती : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या अमरावतीत होऊ घातलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने अमरावती ‘ट्रायबल’ने केलेली काहीशी तयारी बारगळली.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मोहिली (अघई) येथे मलिक शैक्षणिक संकुलात १९ ते २१ जानेवारी २०१८ यादरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. या क्रीडा स्पर्धाच्या समारोपाप्रसंगी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी क्रीडा ध्वज उतरवून अमरावती अपर आयुक्तांकडे  देताना पुढील वर्षाच्या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद अमरावती एटीसी कार्यक्षेत्राकडे सोपविले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अमरावतीसह नागपूर, ठाणे व नाशिक अपर आयुक्तांनी वेळापत्रकानुसार नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याची तयारी चालविली. दुसरीकडे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त द. कृ. पानमंद यांच्या कार्यालयाने ३१ आॅक्टोबर रोजी ई-मेलद्वारे अमरावतीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनासंदर्भात तारीख निश्चित करून आवश्यक ती पूर्वतयारी करून आयुक्त कार्यालयांकडे अहवाल सादर करण्यास सांगितले. डिसेंबरअखेर क्रीडा स्पर्धा पार पडतील, याकरिता आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह मंत्र्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे कळविले. मात्र, अमरावती ‘ट्रायबल’ने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत जोरदार तयारी असताना आता या स्पर्धा गडचिरोली येथे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त द. कृ. पानमंद यांनी १३ नोव्हेंबर २०१८ रोजी आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांबाबत अमरावती एटीसीसोबत झालेल्या पत्रव्यवहारदेखील केला. मात्र, आठ दिवसांत नेमके कोणते राजकारण झाले, हे कळलेच नाही. अचानक आता आदिवासी आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गडचिरोली येथे करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.       आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतलेला निर्णय कुणी फिरविलाआदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावती अपर आयुक्त कार्यक्षेत्रात होतील, असा निर्णय त्यांनीच घेतला. त्याअनुषंगाने तयारी देखील सुरू झाली. मात्र, आता या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत घेण्यामागील कारण काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. ना. विष्णू सावरा यांच्या निर्णयाला कोणी आव्हान दिले, अशी चर्चासुद्धा आदिवासी विकास विभागात रंगू लागली आहे. क्रीडा ध्वज उतरविताना पुढील स्पर्धांचे आयोजन निश्चित केले जाते. त्यानुसार जबाबदार अधिकाऱ्यांकडे हे क्रीडा ध्वज सोपविण्याची परंपरा आहे. अमरावती अपर आयुक्तांकडे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत ध्वज सोपविले, हे विशेष.

‘‘राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावतीत घेण्याचे यापूर्वी ठरले आहे. त्यानुसार तयारीदेखील करण्यात आली. मात्र, गडचिरोली येथे विभाागाचे स्वतंत्र क्रीडा संकूल असल्यामुळे या स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यासंदर्भात विचारमंथन सुरू आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही.  - गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

टॅग्स :Amravatiअमरावती