अमेरिकन ओपन
By Admin | Updated: August 25, 2014 23:48 IST2014-08-25T23:48:46+5:302014-08-25T23:48:46+5:30
रंदवास्काचा दुसर्या फेरीत प्रवेश

अमेरिकन ओपन
र दवास्काचा दुसर्या फेरीत प्रवेश न्यूयॉर्क : चौथे मानांकनप्राप्त पोलंडच्या अग्निस्का रंदवास्का हिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शानदार विजय मिळवून आगेकूच केली़ रंदवास्का हिने ४७ मिनिटे रंगलेल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कॅनडाच्या शेरॉन फिचमॅन हिच्यावर ६-१, ६-० असा शानदार विजय मिळवीत स्पर्धेच्या दुसर्या फेरीत आपले स्थान निश्चित केले़ जागतिक क्रमवारीत ११२ व्या क्रमांकावर असलेल्या फिचमॅनला दुसर्या सेटमध्ये केवळ तीन पॉइंटची कमाई करता आली़ रंदवास्काला पुढच्या फेरीत आता चीनच्या पेंग शुहाई आणि चाँग झी यांच्यात होणार्या लढतीतील विजेत्या खेळाडूंशी झंुज द्यावी लागणार आहे़ महिला गटातील अन्य लढतीत जपानच्या ३१ वे मानांकन प्राप्त कुरूमी नारा हिने कॅनडाच्या अलेक्सांद्र वोजनियाक हिच्यावर ६-२, ६-१ असा विजय मिळविला़ नारा हिला दुसर्या फेरीत स्वीत्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचचे आव्हान असणार आहे़ बेनसिच हिने अन्य लढतीत बेल्जियमच्या यानिना विकमेयरचा ६-३, ६-२ असा पराभव केला़ पुरुष गटातील लढतीत अर्जेंटिनाच्या २३ वे मानांकनप्राप्त लियोनार्डो मेयर याने दुसर्या फेरीत प्रवेश केला़ स्पेनच्या अल्बर्ट मोंटानेसने मेयर विरुद्धच्या लढतीतून माघार घेतली़ त्यामुळे मेयरला स्पर्धेत पुढे चाल मिळाली़ (वृत्तसंस्था)