अमेरिका वि. पोर्तुगाल २-२ अनिर्णित सामना

By Admin | Updated: June 23, 2014 06:17 IST2014-06-23T06:17:18+5:302014-06-23T06:17:18+5:30

दोन्ही संघांत काट्याची टक्कर झाली असली तरीही पोर्तुगालने अमेरिकेला पुरते दमवले होते.

America vs. Portugal 2-2 draw draws | अमेरिका वि. पोर्तुगाल २-२ अनिर्णित सामना

अमेरिका वि. पोर्तुगाल २-२ अनिर्णित सामना

ऑनलाइन टीम

रिओ दे जिनेरिओ, दि. २३ - दोन्ही संघांत काट्याची टक्कर झाली असली तरीही पोर्तुगालने अमेरिकेला पुरते दमवले होते. पोर्तुगालच्या नानीने ५ व्या मिनिटाला गोल करत प्रेक्षकांच्या जल्लोषाला वाट मोकळी करून दिली. खेळाच्या दुस-या भागात अमेरिकेच्या जोन्सने पहिला गोल केला. आणि अमेरिकन प्रेक्षक, कोच आणि खेळाडू यांचा जीव भांड्यात पडला. अमेरिन प्रेक्षकांच्या जल्लोषाला उधाण आले असतानाच ८१ व्या मिनिटाला क्लिन्ट डेम्प्सीने दुसरा गोल करत आपण विजयी होणार असल्याचा दावा केला. परंतू, हा दावा फार काळ टिकला नाही. थोडयाचवेळात पोर्तुगाल च्या व्हरेलाने गोल करत सामना अनिर्णित करून ठेवण्यास भाग पाडले.

Web Title: America vs. Portugal 2-2 draw draws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.