महिला जिम्नॅस्टचा शोषणाचा आरोप

By Admin | Updated: September 18, 2014 01:22 IST2014-09-18T01:22:02+5:302014-09-18T01:22:02+5:30

ट्रेनी स्तरावरील महिला जिम्नॅस्टने आशियाई स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक असलेले मनोज राणा आणि जिम्नॅस्ट खेळाडू चंदन पाठक यांच्यावर शोषणाचा आरोप केला आह़े

The allegations of exploitation of women gymnasts | महिला जिम्नॅस्टचा शोषणाचा आरोप

महिला जिम्नॅस्टचा शोषणाचा आरोप

नवी दिल्ली : ट्रेनी स्तरावरील महिला जिम्नॅस्टने आशियाई स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक असलेले मनोज राणा आणि जिम्नॅस्ट खेळाडू चंदन पाठक यांच्यावर शोषणाचा आरोप केला आह़े या प्रकरणी दिल्ली पोलिसांत या प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आह़े 
या महिला जिम्नॅस्टने दिल्ली पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, प्रशिक्षक आणि जिम्नॅस्ट खेळाडूंनी 2 सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सराव सत्रदरम्यान कपडय़ांबद्दल अश्लील शब्दात टिपणी केली होती, तसेच लज्ज वाटेल असे इशारेही केले होत़े आशियाई स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दक्षिण कोरियाला रवाना झालेले राणा आणि पाठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात भारतात परतणार आहेत़ त्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आह़े  दरम्यान, प्रशिक्षक आणि जिम्नॅस्टपटू महिला खेळाडूच्या शोषनप्रकरणी दोषी आढळल्यास दोघांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे भारतीय जिम्नॅस्ट महासंघाने (जीएफआय) सांगितले आह़े 
फुटबॉलपटूही अडकला
 आशियाई स्पर्धेत पॅलेस्टिनी फुटबॉलपटू महिला कर्मचारीच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकला आह़े  त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.

 

Web Title: The allegations of exploitation of women gymnasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.