३ र्‍या सब. ज्युनिअर लगोरी स्पर्धेत आमदार चषकाचे मानकरी विजयी पिंपरी चिंचवड तर उपविजयी रायगड

By Admin | Updated: August 21, 2014 19:33 IST2014-08-21T19:33:15+5:302014-08-21T19:33:15+5:30

??? : महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा लगोरी संघटनेच्या विद्यमाने ३ री राज्य सब. ज्युनिअर लगोरी स्पर्धा व आमदार अण्णा बनसोडे चषकाचे आयोजन पुणे येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, नारायण बहिवडे, पिंपरी चिंचवड संघटनेचे अध्यक्ष ॲड. गिरिधारी अग्रवाल, शिवाजी पगडे, सचिव संतोष गुरव, शैलेंद्र पोटणीस (तांत्रिक मार्गदर्शक), राजू गोसावी उपस्थित होते. या पाहुण्यांना १८ जिल्ह्यातील ३५० खेळाडूंनी परेड मार्च करुन मानवंदना दिली. या खेळाचे उद्घाटन बाळासाहेब लांडगे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते लगोरी फोडून करण्यात आले. याप्रसंगी अण्णा बनसोडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपला भारतीय पारंपारिक लगोरी खेळ आज आंतरराष्ट

All three Junior lagori champion man of the tournament winner pimpri Chinchwad and subwijay raigad | ३ र्‍या सब. ज्युनिअर लगोरी स्पर्धेत आमदार चषकाचे मानकरी विजयी पिंपरी चिंचवड तर उपविजयी रायगड

३ र्‍या सब. ज्युनिअर लगोरी स्पर्धेत आमदार चषकाचे मानकरी विजयी पिंपरी चिंचवड तर उपविजयी रायगड

???
: महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा लगोरी संघटनेच्या विद्यमाने ३ री राज्य सब. ज्युनिअर लगोरी स्पर्धा व आमदार अण्णा बनसोडे चषकाचे आयोजन पुणे येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, नारायण बहिवडे, पिंपरी चिंचवड संघटनेचे अध्यक्ष ॲड. गिरिधारी अग्रवाल, शिवाजी पगडे, सचिव संतोष गुरव, शैलेंद्र पोटणीस (तांत्रिक मार्गदर्शक), राजू गोसावी उपस्थित होते. या पाहुण्यांना १८ जिल्ह्यातील ३५० खेळाडूंनी परेड मार्च करुन मानवंदना दिली. या खेळाचे उद्घाटन बाळासाहेब लांडगे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते लगोरी फोडून करण्यात आले. याप्रसंगी अण्णा बनसोडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपला भारतीय पारंपारिक लगोरी खेळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचला आहे. या लगोरीचा पहिला आमदार चषक माझ्या नावाने होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. आ. बनसोडे यांनी बाळासाहेब लांडगे यांना विनंती केली की, लगोरी या खेळाचा महाराष्ट्र ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करुन घ्यावा, यानंतर बाळासाहेब लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व खेळाडूंना लगोरी या खेळाचा भावी भवितव्यास महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच लगोरी हा खेळ यावर्षीपासून शालेय स्पर्धेमध्ये आपला खेळ आज संतोष गुरव यांनी सातासमुद्रापलिकडे पोहचविला आहे. भावी भवितव्यामध्ये आपण लगोरी या ख्ेाळाचे नाव सर्व खेळाडू उज्वल कराल, अशी मला खात्री आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ भारतीय लगोरी संघटनेचे सचिव संतोष गुरव, पिंपरी चिंचवड नगरसेवक सद्गुरु कदम, नारायण बहिवडे, ॲड. गिरीधारी अग्रवाल, राजू गोसावी, विजय रेपुगडे, शिवाजी पगडे यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी खेळाडूंना अण्णा बनसोडे चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. मुलांमध्ये विजयी चषक पिंपरी चिंचवड तर उपविजयी रागयड ठरला. पिंपरी चिंचवड रायगडला १८-३, ६-७, २८-१५ ने नमविले. गुलींमध्ये पुणे शहराने पिंपरी चिंचवडला ६-४, ५-७, ८-५ ने नमविले. मुलांमध्ये तृतीय नांदेड, चतुर्थ पुणे शहर तर मुलींमध्ये तृतीय कोल्हापूर, चतुर्थ पुणे शहर विजयी खेळाडू मुले (पि.चिंचवड) केतन सोनावणे, कुणाल इंगळे, प्रथमेश माने, निलेश पवार, भावेश देसले, सुसर

Web Title: All three Junior lagori champion man of the tournament winner pimpri Chinchwad and subwijay raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.