अखिल गोवा आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धा
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:24+5:302014-11-22T23:30:24+5:30
पणजी : गोवा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पहिली अखिल गोवा आमंत्रित स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर शुक्रवारपासून (दि. २८) सुरू होणार आहे.ही स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. स्पर्धेत भारताचा माजी ऑलिम्पियन सुरेश तसेच माजी आशियाई ज्युनियर सुवर्णपदक विजेता संतोष हरिजन सहभागी होणार आहे. आंध्रप्रदेश येथील युवा विश्व रौप्यपदक विजेती निखत झरिनसुद्धा स्पर्धेचे आर्कषण असणार आहे. ती ई चिरंजिवी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

अखिल गोवा आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धा
प जी : गोवा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पहिली अखिल गोवा आमंत्रित स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर शुक्रवारपासून (दि. २८) सुरू होणार आहे.ही स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. स्पर्धेत भारताचा माजी ऑलिम्पियन सुरेश तसेच माजी आशियाई ज्युनियर सुवर्णपदक विजेता संतोष हरिजन सहभागी होणार आहे. आंध्रप्रदेश येथील युवा विश्व रौप्यपदक विजेती निखत झरिनसुद्धा स्पर्धेचे आर्कषण असणार आहे. ती ई चिरंजिवी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते होईल. या वेळी गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रोहन खंवटे उपस्थित असतील. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि क्रीडा मंत्री रमेश तवडकर उपस्थित राहणार आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)