अल्जेरियाची वाटचाल बाद फेरीकडे

By Admin | Updated: June 24, 2014 01:33 IST2014-06-24T01:33:52+5:302014-06-24T01:33:52+5:30

रंगतदार लढतीत अल्जेरियाने दक्षिण कोरियाचा 4-2 ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत प्रथमच बाद फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली.

Algiers walk back to the round | अल्जेरियाची वाटचाल बाद फेरीकडे

अल्जेरियाची वाटचाल बाद फेरीकडे

>पोटरे अॅलेग्रे : रंगतदार लढतीत अल्जेरियाने दक्षिण कोरियाचा 4-2 ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत प्रथमच बाद फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली. 
पश्चिम जर्मनीविरुद्ध 1982 मध्ये मिळविलेल्या विजयानंतर उत्तर आफ्रिकन देश अल्जेरियाचा विश्वकप स्पर्धेतील 
हा पहिला विजय ठरला. आफ्रिकन संघ विश्वकप स्पर्धेत प्रथमच 4 गोल नोंदविण्यात यशस्वी ठरला. अल्जेरियातर्फे इस्लाम स्लिमानी, रफिक हालिचे व अब्देलमोमे जबाऊ यांनी गोल नोंदवत मध्यतंरापूर्वीच संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला होता. सोन ह्युंग व कू जा चियोल यांनी सामन्याच्या दुस:या सत्रत गोल नोंदवत कोरियन संघाच्या आशा पल्लवित केल्या; पण अल्जेरियातर्फे यासिन ब्राहिमीने चौथा गोल नोंदवत संघाचा विजय निश्चित केला. या विजयामुळे अल्जेरिया संघ 3 गुणांसह ‘एच’ गटात बेल्जियमनंतर दुस:या स्थानी दाखल झाला. रशिया व कोरिया यांच्या खात्यावर प्रत्येकी एका गुणाची नोंद आहे. 
या लढतीत अल्जेरिया संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. सोफेन फेगोली व स्लिमानी यांनी सुरुवातीपासून कोरियन गोलकिपर जुंग सुंग रयोंगवर वर्चस्व गाजविले. कार्ल मेजानीच्या पासवर स्लिमानीने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोन मिनिटांनी हालिचेने हेडरद्वारा गोल नोंदवत संघाला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला 8 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना स्लिमानीच्या पासवर जबाऊने गोल नोंदवत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरार्पयत अल्जेरिया संघ 3-क्ने आघाडीवर होता. कोरियाने सामन्याच्या दुस:या सत्रत चमकदार खेळ केला. दुस:या सत्रत पाचव्या मिनिटाला सोनने कोरिया संघाचे खाते उघडले. यासिनने अल्जेरियातर्फे चौथा गोल नोंदवत संघाला 4-1 अशी दमदार आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 2क्क्2मध्ये उपांत्य फेरीत धडक मारणा:या कोरिया संघातर्फे कू जा चियोलने नोंदविलेला गोल केवळ पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Algiers walk back to the round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.