अल्जेरियाची द. कोरियावर ४-२ ने मात
By Admin | Updated: June 23, 2014 08:34 IST2014-06-23T06:32:47+5:302014-06-23T08:34:12+5:30
अल्जेरियाने तब्बल चार गोल करत द. कोरियाला धूळ चारली. अल्जेरियाच्या स्लिमानी याने २६व्या मिनिटाला पहिला गोल केला.
अल्जेरियाची द. कोरियावर ४-२ ने मात
ऑनलाइन टीम
रिओ दे जेनेरिओ, दि. २३ -अल्जेरियाने तब्बल चार गोल करत द. कोरियाला धूळ चारली. अल्जेरियाच्या स्लिमानी याने २६व्या मिनिटाला पहिला गोल केला. प्रेक्षक स्लिमानीचा जयघोष करत असताना त्यापाठोपाठ हॅलिचनेही दुसरा गोल करत २-० अशी आघाडी घेतली. नंतर अवघ्या १० मिनिटांच्या फरकाने म्हणजेच ३८ व्या मिनिटाला ड्जाबू ने तिसरा गोल करत द. कोरियावरील दडपण वाढवले. त्यांनतर ५० व्या मिनिटाला कोरियाच्या सोन हूंग मिन याने गोल केल्यावर ३-१ अशी गोलसंख्या झाल्याने कोरियाच्या प्रेक्षक व प्रशिक्षकांना हायसे वाटले. मात्र त्यानंचतर अल्जेरियाने पुन्हा आघाडी घेतली, ब्राहीमीने चौथा गोल केला. मात्र तरीही सामना अतिशय अटीतटीचा झाला, कारण ७२ व्या मिनिटाला गोल करत द. कोरियाच्या कुचेओलने प्रेक्षकांना दिलासा दिला. हा कोरियाचा शेवटचा गोल ठरला आणि अल्जेरियाच्या खेळाडूंनी आपली आक्रमकता वाढवत त्यांना गोल करण्यापासून रोखून धरले आणि सामना सहज जिंकला.