अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव

By Admin | Updated: September 17, 2016 04:59 IST2016-09-17T04:59:02+5:302016-09-17T04:59:02+5:30

क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. रहाणेला या वर्षीचा तर रोहितला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

Ajinkya Rahane, Rohit Sharma's Gala by Arjun Award | अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव

अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. रहाणेला या वर्षीचा तर रोहितला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ््यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व्यस्त असल्याने हे दोन्ही खेळाडू पुरस्कार वितरण सोहळ््यात उपस्थित राहू शकले नव्हते.
गोयल म्हणाले की, भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अन्य खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.

Web Title: Ajinkya Rahane, Rohit Sharma's Gala by Arjun Award