अजिंक्य-राधिकाची जोडी ‘फिक्स’ !
By Admin | Updated: September 21, 2014 01:33 IST2014-09-21T01:33:20+5:302014-09-21T01:33:20+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा उभरता स्टार खेळाडू अजिंक्य रहाणो आणि त्याची शेजारी राधिका धोपवलकर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

अजिंक्य-राधिकाची जोडी ‘फिक्स’ !
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा उभरता स्टार खेळाडू अजिंक्य रहाणो आणि त्याची शेजारी राधिका धोपवलकर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही परिवारांतील सदस्यांनी हा ‘सामना फिक्स’ केला. येत्या 26 सप्टेंबरला मुंबईत हा विवाह सोहळा होईल.
अजिंक्य हा मुलंड येथे राहतो. तेथूनच काही अंतरावर राधिका धोपवलकरचेही घर आहे. अजिंक्यच्या वडिलांनी राधिकाच्या वडिलांकडे अजिंक्यच्या लग्नासाठी विचारणा केली होती. त्यास त्यांना होकार मिळाला. आता मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा होणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने होणा:या या सोहळ्यास दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित असेल. दि. 28 रोजी होणा:या स्वागत समारंभास भारतीय क्रिकेट मंडळातील पदाधिकारी, तसेच संघ सहकारी उपस्थित राहतील, असेही सूत्रंनी सांगितले.
लग्नानंतर अजिंक्य-राधिका ही जोडी इंडोनेशियातील प्रसिद्ध असलेल्या बाली येथे मधुचंद्रासाठी जाणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध 8 ऑक्टोबरपासून होणा:या एकदिवसीय मालिकेसाठी तो संघात असेल. अजिंक्य हा भारतीय संघाचा सदस्य आहे. त्याने इंग्लंड दौ:यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकाविले होते. संघातील तो सर्वात यशस्वी खेळाडू होता. (प्रतिनिधी)