अजय जयरामने विजेतेपद राखले
By Admin | Updated: October 11, 2015 23:50 IST2015-10-11T23:50:38+5:302015-10-11T23:50:38+5:30
भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामने एस्तोनियाच्या राउल मस्टवर एकतर्फी विजय मिळवताना डच ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद कायम राखले आहे

अजय जयरामने विजेतेपद राखले
नेदरलॅड : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामने एस्तोनियाच्या राउल मस्टवर एकतर्फी विजय मिळवताना डच ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद कायम राखले आहे.
कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तीन आठवड्यांच्या कालावधीतच जयराम याने शानदार प्रदर्शन कायम राखताना बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेल्या राउल याचा केवळ ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला.
मुंबई येथे जन्मलेल्या या २८ वर्षीय बॅडमिंटनपटूला सन २०१० साली आॅस्ट्रिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मात्र विजय मिळवत पराभवाचा शिक्का पुसून टाकण्यात यश मिळवले. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेल्या जयराम याने सामन्याच्या सुरूवातीसच दबाव राखत प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढूच दिले नाही. जयराम याने मागील वर्षी देखील डच ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.(वृत्तसंस्था)