एअर इंडियाची उपांत्य फेरीत ‘भरारी’
By Admin | Updated: November 14, 2014 01:38 IST2014-11-14T01:38:55+5:302014-11-14T01:38:55+5:30
गतवर्षीच्या उपविजेत्या एअर इंडियाने गुरुवारी 49व्या बॉम्बे सुवर्णचषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत जबरदस्त कमबॅक करून उपांत्य फेरीत धडक मारली.

एअर इंडियाची उपांत्य फेरीत ‘भरारी’
मुंबई : गतवर्षीच्या उपविजेत्या एअर इंडियाने गुरुवारी 49व्या बॉम्बे सुवर्णचषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत जबरदस्त कमबॅक करून उपांत्य फेरीत धडक मारली. स्पध्रेबाहेर फेकले जाण्याची भीती समोर असताना एअर इंडियाच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळ करून 6-2 अशा फरकाने मध्य रेल्वेला लोळवले आणि आव्हान कायम राखले.
गत लढतीत दक्षिण मध्य रेल्वेविरुद्ध 4-4 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर एअर इंडियाला या लढतीत विजय आवश्यक होता. या विजयामुळे त्यांनी चार गुणांसह उपांत्य फेरीत जागा पक्की केली.
एअर इंडियासाठी समीर दाड याने दोन गोल केले, तर गगनप्रीत सिंह, अयप्पा बी.के., अरमान कुरेशी आणि शिवेंदर सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. 9व्या मिनिटाला गगनप्रीतने एअर इंडियासाठी गोलचे खाते उघडले. त्यापाठोपाठ 25व्या मिनिटाला अयप्पाने, 31व्या मिनिटाला समीर यांनी गोल करून पहिल्या हाफमध्ये एअर इंडियाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. रेल्वेकडून 16व्या मिनिटाला दीपक लाकरा आणि 35व्या मिनिटाला रुबेन केदारी यांनी प्रत्येकी एक गोल करून कडवी टक्कर दिली. दुस:या हाफमध्ये मात्र रेल्वेची गती मंदावली आणि एअर इंडियाने भरारी घेत बाजी मारली.
संक्षिप्त निकाल
ड गट : एअर इंडिया 6 (गगनप्रीत 9 मि., अयप्पा 25 मि., समीर 31 मि. 54 मि., अरमान 47 मि., शिवेंद्र 6क् मि.) विजयी वि. मध्य रेल्वे 2 (दीपक 16 मि., रुबेन 35 मि.)
ब गट : भारत पेट्रोलियम 3 (मनप्रीत 8 मि., एस.व्ही सुनील 42 मि., अमीर 62 मि.) बरोबरी वि. सीएजी 3 (इमरान 2क् मि., दर्शन 55 मि., आजम 56 मि.)