एआयएफएफने विश्वचषकासाठी कंबर कसली
By Admin | Updated: November 15, 2016 23:57 IST2016-11-15T23:57:53+5:302016-11-15T23:57:53+5:30
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फीफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) कंबर

एआयएफएफने विश्वचषकासाठी कंबर कसली
नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फीफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) कंबर कसली असून आपल्या ५५ क्लब संघांना खेळाडूंचा शोध घेण्याचे सांगितले आहे.
एआयएफएफने १६ वर्षांखालील यूथ लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ५५ क्लब संघांना सांगितले की, प्रत्येक क्लबने तीन शिबिरासाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड करावी. या खेळाडूंमधून भारताचा संघ निवडण्यात येईल. यासाठी एआयएफएफने निर्देशक अभिषेक यादवच्या नेतृत्त्वाखाली तीन शिबिरांचे आयोजन केले आहे.