शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेचा ‘अश्वमेध’ रोखला

By admin | Updated: November 28, 2015 02:18 IST

मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला भारतात पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला टीम इंडियाने व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारी तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी लोळवले.

नागपूर : मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला भारतात पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला टीम इंडियाने व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारी तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी लोळवले. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली असून, दखल घेण्याची बाब म्हणजे जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने विदेशात नऊ वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी मालिका गमावली आहे.या पराभवामुळे विदेशात गेल्या नऊ वर्षांमध्ये १० कसोटी मालिका जिंकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा अश्वमेध भारतात रोखला गेला. दक्षिण आफ्रिकेला २००६मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आजतागायत त्यांनी विदेशात कसोटी मालिका गमावली नव्हती, पण आता भारताने त्यांना पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.2006 साली श्रीलंकेविरुद्ध लंकेत २-० असा व्हाइटवॉश मिळाल्यानंतर आफ्रिकेने आजतागायत एकही कसोटी मालिका विदेशामध्ये गमावली नव्हती.कारकिर्दीतील पहिल्या ३१ कसोटी सामन्यांत १५ वेळा एकाच डावात ५ बळी घेणारा अश्विन एकमेव फिरकी गोलंदाज.एकही अर्धशतक न झळकलेल्या या सामन्यात मुरली विजयची (४०) खेळी सर्वाधिक धावांची ठरली.08 फलंदाज वैयक्तिक ३० - ४० धावांच्या खेळीमध्ये बाद झाले. याआधी २०१०-११च्या अ‍ॅसेश मालिकेत अशी कामगिरी झालेली.13आफ्रिकेचे फलंदाज या सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाले. एकूण चौथ्यांदा आफ्रिकेवर अशी नामुश्की ओढावली.